शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : दातांना अशाप्रकारे खराब करतोय मास्क, डेंटिस्टकडून जाणून घ्या बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 4:18 PM

1 / 8
कोरोनापासून बचावासाठी मास्क घालणं फार गरजेचं आहे. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, डबल मास्क व्हायरसला रोखण्यासाठी जास्त सुरक्षित असतो. डेंटिस्ट मास्क लावण्यासोबतच ओरल हायजीन म्हणजे तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेण्याचा सल्ला देतात. एक्सपर्टनुसार जरासं दुर्लक्ष केल्यास तुमचे दात खराब होऊ शकतात.
2 / 8
चेन्नईचे डॉ. ए. रामचंद्रन डायबिटीस हॉस्पिटलच्या निर्देशक आणि सल्लागार पेरियोडोंटिस्ट विनीता रामचंद्रन यांनी 'द हिंदू' सोबत बोलताना सांगितलं की, कधी कधी जास्त वेळ किंवा डबल मास्क वापरल्याने तोंड कोरडं पडतं आणि डिहायड्रेशनची समस्या होऊ लागते.
3 / 8
डॉ. विनीता म्हणाल्या की, 'लोक तोंडाने श्वास घेतात, मास्क लावल्याने श्वास घेण्याची गति थोडी कमी होते. यामुळे तोंड कोरडं पडतं. मास्क लावल्यानंतर लोक बरेचदा पाणी प्यायला विसरतात. यामुळे तोंडात अनेक छोटे छोटे बॅक्टेरिया वाढू लागतात. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी येऊ लागते'.
4 / 8
मद्रास डेंटल कॉलेजच्या प्रिन्सिपल जी. विमला म्हणाल्या की, 'श्वासांची दुर्गंधी तेव्हा येते जेव्हा लोक तोंड बराच वेळ बंद ठेवतात. तसेच आपली लाळ गिळंकृत करणं विसरतात. याची शक्यता त्या लोकांमध्ये जास्त असते जे लोक अनेक तास ICU मध्ये राहतात'.
5 / 8
डॉक्टर विमला यांनी सांगितलं की, मास्क लावल्यामुळे तोंडातून दुर्गंधी, दातांचा किंवा हिरड्यांचा गंभीर आजार होऊ शकतो. मात्र, यावर आणखी रिसर्चची गरज आहे. यात मास्क लावणारे आणि मास्क न लावणारे यांचा तुलनात्मक अभ्यास होऊ शकतो. आता असा रिसर्च शक्य नाही. कारण आपण विना मास्क कुणलाही संक्रमित करण्याचा धोका घेऊ शकत नाही'.
6 / 8
डॉक्टर विमला यांनी सांगितलं की, ब्राझीलच्या डॉक्टरने हे जाणून घेण्यासाठी एक ऑनलाइन सर्व्हे केला होता. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की, लोक महामारीतही डेंटिंस्टकडे जात आहेत का. जर्नल कम्युनिटी अॅन्ड प्रिवेंटिव डेंटिस्ट्रीमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, मास्कचा प्रभाव तोंडाच्या स्वच्छतेवर पडत आहे.
7 / 8
रिसर्चनुसार मास्कमुळे लोकांची ब्रश करण्याची सवयही कमी झाली आहे. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या वाढली आहे. तसेच रिसर्चमधून असंही आढळून आलं की, लोकांना दातांच्या पिवळेपणाची समस्या नव्हती. कारण मास्क लावून ते बिनधास्त हसत होते. त्यावेळी त्यांचे दात दिसत नव्हते.
8 / 8
वैज्ञानिकांचं मत आहे की, ओरल हायजीनकडे दुर्लक्ष केल्यास दात पडणे, हिरड्यांमध्ये सूज आणि पिरियडोंटल इन्फेक्शनचा धोका वाढतो. डॉक्टर विनीता सांगतात की, मास्क लावण्यासोबतच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी वेळोवेळी पाणी पित रहावे आणि तोंड चांगलं स्वच्छ करा. जर तुम्ही कपड्याच्या मास्कचा वापर करत असाल तर तो रोज धुवावा.
टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधनcorona virusकोरोना वायरस बातम्या