शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

covid-19 cdc advisory : बाहेरून कोणीही आल्यास तुमच्या घरातही होऊ शकतो कोरोनाचा शिरकाव; CDC नं दिल्या गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 11:36 AM

1 / 10
कोरोनाची दुसरी लाट खूप संक्रामक असून कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे. हे संक्रमण कोणालाही होऊ शकते. ज्या ठिकाणाला तुम्ही सुरक्षित समजत आहात तेच ठिकाणी संसर्ग पसरण्याचं कारण ठरू शकतं. घरातील सदस्य बाहेरून आल्यानंतर जराही निष्काळजीपणा केला तरी संपूर्ण घर संक्रमित होऊ शकतं. तुम्ही घरी कोरोना संसर्गाला कसं लांब ठेवू शकता याबाबत सीडीसीनं गाईडलाईन्स दिल्या आहेत.
2 / 10
आपले हात साबण आणि पाण्यानं व्यवस्थित धुवा. जर पाणी उपलब्ध नसेल तर सॅनिटायजरचा वापर करा. आपले डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.
3 / 10
जेव्हाही तुम्ही घरातून बाहेर पडत असाल तेव्हा मास्क घालायलाच हवा. नाक, तोंड व्यवस्थित झाकलं जायला हवं. मास्क लावल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणार नाही. याची काळजी घ्या
4 / 10
बाहेर वावरताना ६ फुटांचे अंतर ठेवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की लक्षणं नसलेले लोकही कोरोना संसर्ग पसरवू शकतात. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. तुम्ही जितक्या जास्त लोकांच्या संपर्कात याल तेव्हढंच संक्रमण वाढण्याची शक्यता असेल.
5 / 10
जर तुम्ही मास्क लावला असेल आणि तरीही शिंका येत असतील मास्क अजिबात बाजूला करू नका. शिंकून झाल्यानंतर मास्क बदला आणि आपले हात साबणानं स्वच्छ धुवा. वापरलेला मास्क डस्टबिनमध्ये फेकून द्या.
6 / 10
सतत तापमान तपासून पाहावे. जास्त ताप किंवा अंगदुखीची, सर्दीची लक्षणं जाणवल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
7 / 10
ज्या जागांच्या वारंवार संपर्कात असता. बटणं, दरवाज्याचे हँण्ड्ल, डेस्क, फोन, किबोर्ड, नळ, सिंक वारंवार स्वच्छ करत राहायला हवे.
8 / 10
आपण जेवण एकमेकांना देऊ नये, ग्लास, कप, ताट वेगळं ठेवल्यास संक्रमणाचे प्रमाण कमी होईल.
9 / 10
ऑफिस किंवा कुठूनही घरी आल्यानंतर लगेचच अंघोळ करायला हवी. अंघोळ करणं शक्य होत नसल्यास स्वच्छ हात पाय धुवावेत.
10 / 10
ऑफिस किंवा कुठूनही घरी आल्यानंतर लगेचच अंघोळ करायला हवी. अंघोळ करणं शक्य होत नसल्यास स्वच्छ हात पाय धुवावेत.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या