Coronavirus: Scientists decode how Covid-19 begins to appear in humans
Coronavirus: कोरोना व्हायरसच्या लक्षणांचा क्रम संशोधकांनी शोधला; डॉक्टरांना मिळणार मोठी मदत By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 2:46 PM1 / 10चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देश सध्या संकटात आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी वैज्ञानिक कोरोना लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. 2 / 10याच दरम्यान अमेरिकन संशोधकांनी माणसांमध्ये कोविड -१९ च्या संभाव्य लक्षणांचे अनुक्रम डीकोड केले आहेत. त्याअंतर्गत कोरोनाला संसर्ग झाल्यावर प्रथम ताप, त्यानंतर खोकला, स्नायू दुखणे आणि नंतर मळमळ किंवा उलट्या होणे, अतिसार सुरू होणे ही लक्षणे दिसतात. 3 / 10कोविड -१९ च्या लक्षणांचा क्रम जाणून घेतल्यास रूग्णांना त्वरित वैद्यकीय मदत मिळू शकते किंवा शक्य तितक्या लवकर स्वत:ला सेल्फ आयसोलेशन निर्णय घेण्यासाठी मदत मिळू शकते. 4 / 10फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, लक्षणांचा क्रम ओळखून डॉक्टरांना रूग्णांवर उपचारांची योजना बनविता येते आणि कदाचित लवकरात लवकर रोगावर नियंत्रण मिळण्यास मदत मिळेल. 5 / 10कोविड -१९ या संसर्गाची लक्षणे असणार्या फ्लूसारख्या आजाराचे चक्र आपण कधी पार करत आहोत हे जाणून घेण्यासाठी हा क्रम विशेषतः महत्वाचा आहे असे अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन लेखक पीटर कुन यांनी सांगितले.6 / 10या संशोधनाचे दुसरे लेखक जोसेफ लार्सन म्हणाले की, कोविड -१९ च्या उपचारांसाठी आता अधिक चांगले पर्याय उपलब्ध आहेत, जे ओळखून रुग्णाला रुग्णालयात दाखल करू शकतो. 7 / 10ताप आणि खोकल्याचे विविध प्रकार बर्याचदा श्वसनाचे विविध आजाराशी जोडलेले असतात. ज्यात मिडल ईस्ट रेस्पीरी सिंड्रोम (मार्स) आणि सार्स यांचा समावेश आहे. तथापि, कोविड -१९ ची गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट्समधील लक्षणे पाहून ओळखले जाऊ शकते.8 / 10शास्त्रज्ञांनी लिहिले, वरच्या जठरोगविषयक ट्रॅक (मळमळ / उलट्या) खालच्या गेस्ट्रोइनेस्टाइनल ट्रॅक्ट (अतिसार) आधी होण्यास सुरुवात होते, ही कोविड -१९ ची लक्षण आहे 9 / 10ही लक्षणे मार्स व सार्सच्या विरोधाभासी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एकत्रित केलेल्या चीनमध्ये कोरोना विषाणूच्या ५५ हजार पेक्षा जास्त रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता संशोधकांनी या संसर्गाच्या लक्षणांच्या अनुक्रमाचा अंदाज वर्तविला आहे. 10 / 10सध्या जगभरात २ कोटी १६ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७ लाख ५० हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा २५ लाखांवर पोहचला आहे तर ५० हजारांपर्यंत रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications