शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : वैज्ञानिकांचा दावा 'माउथ वॉशने नष्ट होऊ शकतो कोरोना व्हायरस', पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 1:06 PM

1 / 10
कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी जगभरातील वेगवेगळे वैज्ञानिक दिवसरात्र रिसर्च करत आहेत. वेगवेगळे वैज्ञानिक आपली वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत, रिसर्च समोर आणत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी असाच एक रिसर्च समोर आला आहे. पण याला WHO कडून मान्यता मिळालेली नाही. (प्रातिनिधीक छायाचित्र)
2 / 10
मेडिकल सायंटिस्टच्या एका आंतरराष्ट्रीय टीमच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, माउथ वॉशमध्ये कोरोना व्हायरसला मारण्याची क्षमता आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, शरीराचे सेल्स संक्रमित करण्याआधीच माउथ वॉश व्हायरसला मारून कोविड-19 पासून बचाव करू शकतो. पण WHO ने याआधी माउथ वॉशबाबत वेगळं मत व्यक्त केलं होतं.
3 / 10
WHO ने याआधी सांगितले होते की, सध्या असा कोणताही पुरावा नाही की, माउथ वॉशने तुमचा कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव होऊ शकेल.
4 / 10
पण ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी प्रेसच्या फंक्शन मॅगझिनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, माउथ वॉशमध्ये व्हायरसला मारण्याची क्षमता आहे आणि याबाबत क्लिनिकल ट्रायल करणं फार गरजेचं आहे.
5 / 10
ब्रिटनच्या कार्डिफ यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी फंक्शनमध्ये हा रिसर्च प्रकाशित केला आहे. वैज्ञानिकांच्या या टीमला कार्डिफ यूनिव्हर्सिटीच्या वायरोलॉजिस्टसोबतच नॉटिंघम, कोलोराडो, ओटावा, बार्सिलोनासहीत इतर यूनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांचंही समर्थन मिळालं होतं.
6 / 10
रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, माउथ वॉश कोरोना व्हायरस बाहेरील आवरणाला नष्ट करू शकतं. टेस्ट ट्यूबमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगात आढळून आलं की, काही माउथ वॉशमध्ये असे तत्व असतात जे Enveloped Viruse' च्या बाहेरील आवरणाला नष्ट करतात.
7 / 10
मुळात कोरोना व्हायरस 'Enveloped Viruse' च्या क्लासचे असतात. याचा अर्थ हा होतो की, तो एका फॅटी लेअरने झाकलेला असतो. ही लेअर काही खासप्रकारच्या केमिकलने नष्ट होते.
8 / 10
रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, माउथ वॉश कोरोना व्हायरस बाहेरील आवरणाला नष्ट करू शकतं. टेस्ट ट्यूबमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगात आढळून आलं की, काही माउथ वॉशमध्ये असे तत्व असतात जे Enveloped Viruse' च्या बाहेरील आवरणाला नष्ट करतात.
9 / 10
वैज्ञानिकांनी सांगितले की, दात स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या माउथ वॉशमध्ये Chlorhexidine, Cetylpyridinium Chloride, Hydrogen Peroxide आणि Povidone-Iodine सारखे केमिकल असतात.
10 / 10
वैज्ञानिकांनुसार, या केमिकल्समध्ये संक्रमण रोखण्याची क्षमता असते. असं असलं तरी यावर पुढे रिसर्च झाला नाही आणि WHO कडूनही याला अधिकृत मान्यता मिळाली नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealthआरोग्य