शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : कोरोनावरील वॅक्सीनबाबत आणखी एक मोठं यश, लवकरच मिळू शकते खूशखबर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:15 AM

1 / 9
ब्रिटनने कोरोना व्हायरसची आणखी एक वॅक्सीन तयार केली आहे. या वॅक्सीनचा ट्रायल लवकर मनुष्यांवर केलं जाणार आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की, मनुष्यावर याचा प्रयोग यशस्वी झाला तर ही वॅक्सीन 300 रूपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळू शकेल. कोरोनाचं सर्वात जास्त थैमान असलेल्या देशांच्या यादीत ब्रिटन भारतानंतर पाचव्या स्थानावर आहे.
2 / 9
इंपिरिअल कॉलेज लंडनचे वैज्ञानिक म्हणाले की, 'आम्हाला आशा आहे की, मनुष्यावर वॅक्सीन ट्रायलच्या पहिल्या टप्प्यासाठी त्यांना परवानगी मिळेल. यादरम्यान आम्ही बघू की, ही वॅक्सीन मनुष्यावर किती सुरक्षित असेल'.
3 / 9
वॅक्सीन तयार करणाऱ्या ग्रुपचे प्रमुख प्राध्यापक रॉबिन शेटॉक म्हणाले की, 'आमच्या टीमची इच्छा आहे की, लोकांना एक स्वस्त आणि सुरक्षित वॅक्सीन मिळावी. जेणेकरून ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसने पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना 20 अब्जापेक्षा कमी खर्चात ठीक करता यावं'.
4 / 9
ते म्हणाले की, इंपिरिअल कॉलेजजवळ या प्रोजेक्टवर खर्च करण्यासाठी पुरेसा पैसा आहे. या पैशातून ते यूनायटेड किंगडम हेल्थ सर्व्हिस आणि सोशल केअर वर्कर्ससाठी सहजपणे वॅक्सीन तयार करू शकतील.
5 / 9
त्यांनी असेही सांगितले की, वॅक्सीनच्या ह्यूमन ट्रायलला परवानगी मिळाल्यानंतर जर यश मिळालं तर पुढील टप्प्यात आम्ही साधारण 6 हजार लोकांवर टेस्ट करू.
6 / 9
असं असलं तरी प्राध्यापक शेटॉक म्हणाले की, प्लाननुसार सगळं काही ठीक झालं तरी सुद्धा ही वॅक्सीन 2021आधी मिळू शकणार नाही.
7 / 9
दरम्यान कोविड-19 ची ब्रिटीश वैज्ञानिकांद्वारे तयार केलेली ही दुसरी वॅक्सीन आहे. याआधी ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी एक वक्सीन तयार केली होती, हीच आतापर्यंतच्या सर्वात प्रभावी वॅक्सीन मानली जाते. यावर अजून काम सुरू आहे.
8 / 9
ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या वॅक्सीन डॉक्टर सारा गिल्बर्ट यांच्या नेतृत्वात तयार केली होती. सारा गिल्बर्ट यांचा दावा आहे की, जर ट्रायल पिरियडमध्ये सगळं काही ठीक राहिलं तर यावर्षी सप्टेंबरमध्ये लोकांना कोरोना व्हायरसची वॅक्सीन मिळेल.
9 / 9
प्राध्यापक शेटॉक यांनाही सांगितले की, वॅक्सीन तयार करण्यासाठी त्यांना ब्रिटीश सरकारकडून 50 लाख डोस तयार करण्यासाठी पैसे मिळाले आहेत. इतक्या पैशांनी साधारण 25 लाख लोकांसाठी वॅक्सीन तयार केली जाऊ शकेल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यResearchसंशोधन