CoronaVirus snorers could face 3 times higher risk of death from corona virus
"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका" By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 11:27 PM1 / 11झोपेत घोरणाऱ्या लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका तीनपट अधिक असतो, असा दावा युनिव्हर्सिटी ऑफ वावरिकच्या वैज्ञानिकांनी ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनिया आणि कोरोना व्हायरससंदर्भातील 18 अध्ययनांची समीक्षा केल्यानंतर केला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या झोपेत घोरणाऱ्या कोरोना रुग्णांना मृत्यूचा धोका तीनपट अधिक असतो, असे या अभ्यासातून त्यांच्या निदर्शनास आले.2 / 11या अभ्यासातून संशोधकांच्या निदर्शनास आले, की झोपेत गळ्यातील स्नायू रिलॅक्स होत असल्याने, त्यांचा श्वसन मार्ग तात्पुरता बंद होतो. यामुळे लोक घोरतात. रुग्णालयात भरती असलेल्या अशा रुग्णांच्या जीवाला व्हायरसचा अधिक धोका असतो.3 / 11या अभ्यासानुसार, डायबेटीज (Diabetes), लठ्ठपणा (Obesity) आणि हाय ब्लड प्रेशर (High blood bressure) असलेल्या लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. 4 / 11इंग्लंडमध्ये 15 लाख लोकांना 'ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनिया'ची समस्या आहे. यांपैकी 85 टक्के लोक डायग्नोज झालेले नाहीत. अमेरिकेत तर जवळपास सव्वा दोन कोटी लोकांना हा आजार आहे.5 / 11वैज्ञानिकांनी म्हटले आहे, कोरोना रुग्णांच्या प्रकृतीवरील ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियाचा प्रभाव समजून घ्यायचा असेल, तर आणखी संशोधन होणे आवश्यक आहे. 6 / 11या संशोधनातील तज्ज्ञ मिशेल मिलर म्हणाल्या, या संशोधनाचा नकारात्मक प्रभाव समोर आल्याने शॉक होण्याची आवश्यकता नाही. कारण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियाचा संबंध लठ्ठपणासारख्या सर्व आजारांशी आहे, ज्यांत कोरोना रुग्णांच्या जीवाला अधिक धोका आहे.7 / 11यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियाची समस्या असलेल्यांनीदेखील कोरोना झाल्यास अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अशा लोकांनी व्यवस्थितपणे उपचार घ्यावेत आणि धोका कमी करण्यासाठी जास्तीत जास्त सावधगिरी बाळगावी. 8 / 11अशा लोकांनी मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कोरोनाची लक्षणे दिसताच लवकरात लवकर तपासणी करावी. आणि उपचार घेतानाही काळजी घ्यावी.9 / 11मिशेल मिलर यांनी सांगितले, कोरोनामुळे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस आणि इनफ्लेमेशनची शक्यताही मोठ्या प्रमाणावर वाढते. यामुळे शरीरातील ब्लड प्रेशरला कंट्रोल करणाऱ्या ब्रॅडिकिनिनच्या मार्गावर वाईट परिणाम होतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियामध्येही अशा प्रकारची समस्या निर्माण होते.10 / 11यासंदर्भात अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले, की ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियाची समस्या असणारे 10 पैकी 8 कोरोना रुग्ण हाय रिस्कवर असतात.11 / 11डायबेटोलॉजीमधील एका संशोधनानुसार, डायबेटीज आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियामुळे 1,300 रुग्णांत 7 दिवस रुग्णालयात अॅडमिट राहिल्यानंतर मृत्यूचा धोका 2.8 पट (जवळपास तीनपट) वाढला. आणखी वाचा Subscribe to Notifications