Coronavirus some who recover from covid get debilitating spine infection
Coronavirus: भारतात कोरोनाचा आणखी एक गंभीर साइड इफेक्ट आला समोर, डॉक्टरांनी दिला इशारा.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 9:47 AM1 / 9एकीकडे कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे अजूनही कोरोना व्हायरसचे नवे साइड इफेक्ट समोर येत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक लोकांच्या शरीरात कोरोनाचा प्रभाव बरेच दिवस बघायला मिळतो. ज्यामुळे त्यांना नव्या समस्यांचा सामना करावा लागतोय. मुंबईतील डॉक्टरांना काही वयोवृद्ध कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये नवीन इन्फेक्शन आढळून आलं आहे. हे इन्फेक्शन कोरोनामुळे पाठीच्या कण्यात होत आहे.2 / 9टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, जुहू येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये व्हायरल ताप आल्याने ६ वृद्ध रूग्णांना भरती करण्यात आले होते. हे सर्वच लोक कोरोना व्हायरसने संक्रमित होते. यादरम्यान या लोकांच्या पाठीच्या कण्यात इन्फेक्शन आढळून आलं. चाय आठवडे या लोकांवर उपचार करण्यात आले.3 / 9हॉस्पिटलच्या स्पाइन सर्जन डॉक्टर मिहिर बापट म्हणाले की, 'कोविड १९ संक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. या रूग्णांमध्ये संक्रमण इतकं जास्त होतं की, यातील ५ लोकांच्या पाठीच्या कण्याचं ऑपरेशन करावं लागलं. सोबतच त्यांना अॅटींबायोटीकही दिले होते. त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी ३ महिने लागतील'.4 / 9रिपोर्टनुसार, वसईचे राहणारे ६८ वर्षीय रीनोल्ड सिरवेल याना कोरोना व्हायरसमुळे सप्टेंबरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं आतापर्यतचं बिल १५ लाख रूपयांपेक्षा अधिक झालं होतं. आतापर्यंत त्यांना ४ वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यातील एकदा त्यांच्या पाठीच्या कण्याचं ऑपरेशन करण्यात आलं. एक नर्स त्यांना दिवसातून तीन वेळ अॅंटीबायोटीक औषध देण्यासाठी घरी जाते. याचा रोजचा खर्च ७ हजार रूपये आहे.5 / 9सिरवेल यांचा मुलगा विनित म्हणाला की, त्याचे वडील कधीच गंभीर आजारी पडले नाहीत आणि कोरोनाआधी ते रोज १० किमी पायी चालत होते. कोरोना झाल्यावर त्यांना १० दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. इथे त्यांना रेमडेसिवीर औषध देण्यात आलं. घरी परतल्यावर काही दिवसांनी त्यांना पाठीच्या खालच्या भागात वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दोन महिन्यांपासून डॉक्टरकडे जात आहोत. आता त्यांच्यावर स्पाइन ट्यूबरक्लाोसिसचे उपचार सुरू आहेत'.6 / 9सिरवेल यांना डॉक्टर बापट यांच्याकडे रेफर करण्यात आलं. तिथे स्पाइनल बायोप्सीमध्ये रीनोल्डच्या पाठीच्या कण्यात बॅक्टेरिया आढळून आले. खास बाब ही आहे की, हे बॅक्टेरिया केवळ हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आढळून येतात. ७ डिसेंबरला नानावटी हॉस्पिटलमध्ये पाठीच्या कण्याचं ऑपरेशन केल्यावर सिरवेल यांना डिस्चार्ज देण्यात आला. पण अजूनही त्यांना तीन आठवडे अॅंटी बायोटीक औषधे घ्यायची आहेत.7 / 9डॉक्टर बापट म्हणाले की, पाठीच्या कण्यात झालेलं संक्रमण हे कोरोनामुळे नाही तर तर कमी इम्युनिटीमुळे होत आहे. कोरोनाच्या ज्या रूग्णांमध्ये इम्युनिटी फार कमी आहे, त्यांच्या पाठीच्या कण्यात इन्फेक्शन होऊ शकतं. हिंदुजा हॉस्पिटलचे एक स्पाइन सर्जन डॉक्टर समीर दळवी यांनी कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांच्या पाठीच्या कण्यात इन्फेक्शन पाहिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, कोरोना संक्रमणाने शरीराची लढण्याची क्षमता प्रभावित करतो.8 / 9एक दुसरे डॉक्टर म्हणाले की, पाठीच्या कण्यात संक्रमण केवळ हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आढळत असलेल्या सूक्ष्म जीवांमुळे होतं. याचा अर्थ हा आहे की, कोरोनाचे उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल रूग्णांना इथे राहण्यादरम्यान इन्फेक्श होत आहे.9 / 9डॉक्टरांचं मत आहे की, पाठीच्या कण्याच्या इन्फेक्शनबाबत लोकांना लवकर सांगण्याची गरज आहे. डॉक्टर बापट म्हणाले की, जर कोरोनातून रिकव्हर झालेल्या रूग्णांना पाठीत दुखत असेल आणि दोन आठवडे आराम केल्यावर त्यांना बरं वाटत नसेल त्यांना लगेच डॉक्टरांना संपर्क साधावा. आणखी वाचा Subscribe to Notifications