Coronavirus : Surfaces Are ‘Not the Main Way’ Coronavirus Spreads, C.D.C. Says api
Coronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन... By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 11:34 AM1 / 10कोरोना व्हायरसच्या भीतीने बाहेरून घरात आणलेली प्रत्येक वस्तू धुतली जाते किंवा सॅनिटाइज केली जाते. तसेच वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हे सांगण्यात आलं आहे की, सरफेसवर कोरोना व्हायरस काही काळ राहू शकतो. त्यामुळे लोक एकदा काय दोनदा भाजीपाला, वस्तू, ऑनलाइन पार्सल धुतात. मात्र, आता अमेरिकेतल्या एका सरकारी संस्थेनं याबाबत गाईडलाइन जारी केली आहे.2 / 10कोरोना व्हायरस हा प्रामुख्याने दोन मार्गांनी पसरतो असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय. एक म्हणजे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर आणि दुसरा म्हणजे एखाद्या वस्तूवर किंवा जागेवर कोरोना व्हायरस असेल आणि त्या वस्तूला, जागेला आपला हात लागला तर आपल्या हातामार्फत ते नाक, डोळे, तोंड यांच्या माध्यमातून शरीरात जातात. (या लिंकवर माहिती वाचू शकता - https://www.nytimes.com/2020/05/22/health/cdc-coronavirus-touching-surfaces.html)3 / 10या कारणानेच बाहेरून घरी आणलेल्या वस्तू सोडा-मिठाच्या पाण्यात धुवून घेणं, पुसून घेणं सुरू आहे. अशात आता अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल म्हणजे सीडीसी या संस्थेनं काही दिवसांपूर्वी नवी गाईडलाइन जारी केली आहे. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल ही संस्था अमेरिकतील रोग नियंत्रणाचं काम करणारी सर्वोच्च सरकारी संस्था आहे. 4 / 10या गाईडलाइनमध्ये सांगण्यात आले आहे की, वस्तू किंवा सरफेसमार्फत कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी प्रमाणात आहे किंवा होतच नाही. त्यामुळे या संस्थेकडून सतत ऑनलाइन वेगवेगळी माहिती जाहीर केली जाते. असं असलं तरी आपण आपण काळजी म्हणून या गोष्टी स्वच्छ केल्या तर त्यात काहीही चूक नाही. 5 / 10लोकांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांच्या वेबसाइटवरून दिली जातात. त्यात एक प्रश्न होता की, कोरोना वायरस कसा पसरतो? त्यावेळी वरील दोन्ही मार्गाने कोरोना पसरतो असं सांगितलं होतं. 6 / 10मात्र २१ मे रोजी वेबसाइटवर देण्यात आलेल्या कोरोनाबाबतच्या एका प्रश्नाच्या उत्तरात थोडा बदल करण्यात आला असून कोरोना व्हायरस हा प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावरच पसरतो, असं सांगण्यात आलंय. तसेच कोरोना व्हायरस वस्तू, जागा अशा सरफेसवरून सहज पसरत नाही, असंही स्पष्ट करण्यात आलंय.7 / 10त्यात लिहिले आहे की, 'व्हायरस असलेल्या सरफेसला किंवा वस्तूंना हात लागला. तो हात आपण न धुता तसाच डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला लावला तर तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे. पण हा व्हायरस पसरण्याचा मुख्य मार्ग नाही. आपण व्हायरसबाबत अजूनही नवीन माहिती मिळवत आहोत.8 / 10याआधी समोर आलेल्या न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमधे प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातून कोरोना व्हायरस प्लॅस्टिक, स्टील अशा गोष्टींवर तीन दिवस आणि कार्डबोर्डवर २४ तास सक्रिय राहतो, असं सांगण्यात आलंय.9 / 10कोरोना व्हायरस बाहेरून घरात येणाऱ्या वस्तूंवर असू शकतो हे जवळपास सगळ्याच तज्ञांनी मान्य केलं होतं. मात्र आता सीडीसीनं अचानकपणे हे नाकारल्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. पण सीडीसीची भूमिका पहिल्यापासूनच अशीच असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सच्या एका बातमीत म्हटलं आहे10 / 10कोरोनाची लागण झालेला माणूस शिंकला किंवा खोकला तर त्यातून उडणाऱ्या ड्रॉपलेट्समुळे लागण होऊ शकते. म्हणूनच निदान सहा फुटांचं अंतर ठेवण्याची गरज आहे. याचसोबत, हातावरून कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी झाला असला तरी आपण आपले वारंवार हात धुण्याची सवय सोडायला नको, असं सीडीसीनंही सुचवलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications