शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : चीनच्या टॉप एक्सपर्ट म्हणाल्या, '20 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो कोरोना व्हायरस', पण मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 3:23 PM

1 / 13
चीनच्या मुख्य महामारी रोग तज्ज्ञ ली लानजुआन म्हणाल्या होत्या की., मायनस 20 डिग्री सेल्सिअस तापमानात कोरोना व्हायरस 20 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो. तर मायनस 4 डिग्री सेल्सिअसवर अनेक महिने जिवंत राहू शकतो.
2 / 13
चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने चायना न्यूज सर्व्हिसच्या हवाल्याने हे दावे प्रकाशित केले आहेत. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ली लानजुआन यांचं मत आहे की, खासकरून कोरोना व्हायरस कोल्ड रेजिस्टेंट आहे. पण रिपोर्ट प्रकाशित झाल्यावर जेव्हा व्हायरल झाला तेव्हा लानजुआने त्यांचं विधान मागे घेतलं.
3 / 13
ग्लोबल टाइम्सने त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिले होते की, ली लानजुआन सांगतात की, कोरोना व्हायरस थंडीत जास्त वेळ जिवंत राहतो. हेच कारण आहे की, व्हायरस एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचत आहे.
4 / 13
अनेक साहित्य एका देशातून दुसऱ्या देशात फ्रीजिंग टेम्प्रेचरवरच पाठवले जातात. असेही म्हणण्यात आले आहे की, व्हायरस कोल्ड रेजिस्टेंट असल्यानेच चीनच्या फूड मार्केटमध्ये कोरोना अनेकदा आढळून आला.
5 / 13
चीनच्या वृत्तपत्राने इंडस्ट्रीतील लोकांच्या हवाल्याने असेही सांगण्यात आले की महामारी एक्सपर्टच्या विधानानंतर चीनमधील लोक फ्रोजन फूड खरेदी करत नाहीयेत किंवा त्यापासून दूर राहत आहेत.
6 / 13
चीनमध्ये शुक्रवारी अंडरग्राऊंड मार्केटमधून 200 सॅम्पल घेण्यात आले होते. यातील अनेक सॅम्पल पॉझिटिव्ह आले.
7 / 13
याआधी असाही रिपोर्ट समोर आला होता की, चीनच्या झीनफडीमध्ये आयात केलेल्या Salmon चॉपिंग बोर्डवर व्हायरस मिळाले आहेत. त्यानंतर Salmon च्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.
8 / 13
चीनच्या मुख्य वृत्तपत्रांमध्ये रिपोर्ट प्रकाशित झाल्यानंतर महामारी रोग तज्ज्ञ ली लानजुआन यांनी दावा केला की, त्यांचं विधान तोडून मोडून प्रकाशित करण्यात आलंय. (Image Credit : globaltimes.cn)
9 / 13
त्यांनी त्यांचं विधान बदलत सांगितले की, 'कोरोना व्हायरस हा नवीन व्हायरस आहे आणि थंडीबाबत याचा रेजिस्टेंस अजूनही समजू शकलेला नाही'.
10 / 13
ली लानजुआन यांचं वक्तव्य चीनच्या सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं आणि लोक फ्रोजन फूडला दूर करत होते. शनिवारी चीनमधील न्यूज पोर्टल zjol.com.cn सोबत बोलताना लानजुआन यांनी दावा केला की, त्यांचं विधान चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलं.
11 / 13
त्या म्हणाल्या की, फ्रीजिंग टेम्प्रेचरमध्ये व्हायरस जास्त वेळ राहतो हे त्यांना सामान्यपणे म्हटले होते. हे आधीच माहीत असलेल्या व्हायरसबाबत बोबल्या होत्या, कोरोनासाठी नाही.
12 / 13
ली म्हणाल्या की, त्यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं होतं की, कोरोना व्हायरसच्या कोल्ड रेजिस्टेंस असण्याबाबत आणखी रिसर्च करण्याची गरज आहे.
13 / 13
दरम्यान ग्लोबल टाइम्सने सांगितले की, बीजिंगमध्ये कोरोनाचे नुकत्याच ज्या केसेस समोर आल्या, त्यांचा संबंध आयात करण्यात आलेल्या फ्रोजन फूडसोबत आढळून आलाय. (Image Credit : yumda.com)
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनResearchसंशोधन