coronavirus: Take care of yourself when leaving the house after the lockdown BKP
coronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा... By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 5:20 PM1 / 10 देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. मात्र असे असले तरी आता काही भागातून हळूहळू लॉकडाऊन शिथील करण्यात येत आहे. अनेक दुकाने, सलून आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यात येत आहेत. मात्र आता घराबाहेर पडण्यासाठी सवलत मिळत असली तरी बाहेर पडताना खबरदारी घेण्याची आवश्यकताही वाढली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा घराबाहेर पडताना खालील बाबीची काळजी घ्या आणि कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका टाळा. 2 / 10संसर्गाकडे दुर्लक्ष करू नका - देश आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. अर्थव्यवस्थेची स्थिती विचारात घेऊन लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे घराबाहेर पडल्यावर कोरोना विषाणू आपल्या आसपास आहे, असे समजून सावधगिरी बाळगा. 3 / 10 सध्याच्या परिस्थितीती मास्कचा वापर अनिवार्य झाला आहे. त्यामुळे घराबाबेर पडल्यावर मास्कचा वापर करा. सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकांनी मास्कचा वापर केलेला नसेल किंवा सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसेल. त्यामुळे मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. 4 / 10 सध्याच्या परिस्थितीत केवळ गरज असेल तरच घराबाहेर पडणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही केवळ गरज असेल तरच घराबाहेर पडा. फिरायला म्हणून घराबाहेर पडू नका. बाहेरील लोकांशी कमीत कमी संपर्क येईल, याची खबरदारी घ्या. लवकरात लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करा. 5 / 10 बाहेर वावरत असताना लिफ्टचे बटण दाबण्यासाठी किंवा दरवाजा उघडण्यासाठी हाताचा कमीत कमी वापर करा. त्याऐवजी कोपराद्वारे बटण दाबण्याचा किंवा दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास टिश्श्यू पेपरचा वापर करा, तसेच दरवाजा उघडण्यासाठी कपड्यांचा वापर केल्यास ते कपडे घरी आल्यावर स्वच्छ धुवा. 6 / 10 सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. दुकानात किंवा अन्य ठिकाणी गेल्यावर इतरांपासून किमात ६ फुटांचे अंतर ठेवा. तुमच्यात आणि अन्य व्यक्तीत पुरेसे अंतर नाही, असे वाटल्यास मागे सरका, मित्र आणि अन्य शेजाऱ्यांसोबतसु्द्धा सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. 7 / 10 बाहेर पडल्यावर तुमच्याकडील मोबाइल फोन कुठल्याही ठिकाणी ठेवू नका. तसे करावे लागल्यास टिश्शू पेपरचा वापर करा. 8 / 10 बाहेर पडल्यावर तुमच्याकडील मोबाइल फोन कुठल्याही ठिकाणी ठेवू नका. तसे करावे लागल्यास टिश्शू पेपरचा वापर करा. 9 / 10कोरोना विषाणूचा फैलाव हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होतो. त्यामुळे रोखीने व्यवहार करणे शक्यतो टाळा. त्याऐवजी शक्य तेवढे ऑनलाइन व्यवहार करा. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळता येईल. 10 / 10 तसेच बाहेर फिरून घरी आल्यावर पहिल्यांदा आपले हात स्वच्छ धुवा. यावेळी तुमची बोटे आणि बोटांमधील भागही स्वच्छ करा. आणखी वाचा Subscribe to Notifications