Coronavirus: Tata group to launch India's first low cost Covid-19 test 'Feluda
टाटा ग्रुपनं बनवली कोरोना 'फेलुदा' टेस्ट किट; कमी खर्चात लवकरात लवकर देणार अचूक अहवाल By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 7:51 PM1 / 10जगभरात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढतच चालला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच कोरोनाचा खात्मा करण्यासाठी वैज्ञानिक, डॉक्टर्स, टेक्नोलॉजी कंपन्या दिवसरात्रं संशोधन करत आहेत. 2 / 10 यामध्ये आता टाटा समूहाने नवीन कोविड -१९ चाचणी किट बनविली आहे. कंपनीने सीएसआयआर-इंस्टीट्यूट ऑफ जेनोमिक्स अँण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (CSIR-IGIB) च्या संयुक्त विद्यमाने क्लस्टरर्ड रेग्युलरी इन्ट्रेंडेड शॉर्ट पालिंड्रोमिक रिपीट्स कोरोना व्हायरस टेस्ट (CRISPR Corona Test) तयार केली आहे. 3 / 10चांगली बातमी अशी आहे की ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) कोरोना विषाणूच्या तपासणीत टाटाच्या नवीन कोविड -१९ चाचणी 'फेलुदा'(Feluda) च्या सार्वजनिक वापरास मान्यता दिली आहे.4 / 10टाटा समूहाच्या मते, सीआरआयएसपीआर कोरोना चाचणी सर्वात विश्वसनीय RT-PCR चाचणीच्या तुलनेत अचूक निकाल देईल. तसेच यासाठी कमी वेळ आणि खर्च लागेल. या चाचणीमध्ये Sars Cov-2 विषाणूचा जीनोमिक अनुक्रम शोधण्यासाठी स्वदेशी सीआरआयएसपीआर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. 5 / 10भविष्यात हे तंत्रज्ञान इतर साथीच्या आजारांच्या चाचणीमध्ये देखील वापरले जाऊ शकते. कंपनीने म्हटलं आहे की टाटा सीआरआयएसपीआर चाचणी सीएएस 9 प्रोटीन वापरण्याची जगातील अशी पहिलीच चाचणी आहे, जी कोविड १९ साथीच्या रोगाचा प्रसार करणाऱ्या व्हायरसला यशस्वीरित्या ओळखते.6 / 10भारतीय वैज्ञानिक समुदायासाठी ही महत्त्वाची आणि मोठी कामगिरी असल्याचं या समुहाने म्हटले आहे. संशोधन आणि विकासापासून ते उच्च अचूकतेपर्यंत, स्केलेबल आणि विश्वासार्ह चाचणी १०० दिवसांपेक्षा कमी वेळेत तयार केल्या आहेत. 7 / 10टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश कृष्णमूर्ती म्हणतात की कोविड -१९ टाटा सीआरआयएसपीआर चाचणी मंजूर झाल्याने जागतिक साथीच्या आजाराशी लढण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल.8 / 10 टाटा सीआरआयएसपीआर चाचणीचे कमर्शियलाइजेशन हे देशातील सर्वोत्तम संशोधन आणि विकास कौशल्याच्या प्रतिभेचे उदाहरण आहे. ही कौशल्य जागतिक आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संशोधन जगात भारताचे योगदान बदलण्यास मदत करू शकतात. 9 / 10विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले की, टाटा सीआरआयएसपीआर चाचणी सामान्य लोकांवर वापरण्यासाठी डीसीजीआयकडून मान्यता मिळाली आहे. या चाचणीचा निकाल ९८ टक्के लागला आहे. त्याच वेळी, हे ९६ टक्के संवेदनशीलतेसह कोरोना विषाणू ओळखण्यास सक्षम आहे.10 / 10कंपनीच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करीत मंत्रालयाने असंही म्हटलं आहे की, टाटा सीआरआयएसपीआर चाचणी सीएएस -९ प्रोटीन वापरण्याची जगातील अशी पहिलीच चाचणी आहे, ज्याने कोविड -१९ साथीचा रोग पसरविणार्या विषाणूचा यशस्वीपणे शोध लावला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications