शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Third wave: चिंतेत भर! देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 10:38 AM

1 / 10
देशात सलग पाचव्या दिवशी कोरोनाचे 40 हजार नवे रुग्ण समोर आले आहेत. यातच एम्स, नवी दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. देशातत व्हायरसचा प्रजनन दर (आर व्हॅल्यू) वाढत आहे, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे. (CoronaVirus Third wave reproduction rate of the virus increasing AIIMS director and CSIR scientists issued warning)
2 / 10
तसेच, सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी मांडे यांनीही, कोरोनाची तिसरी लाट निश्चित, पण कशी आणि केव्हा येईल हे सांगणे अवघड आहे, असे म्हणटले आहे
3 / 10
डॉ. गुलेरिया म्हणाले, आधी व्हायरसची आर व्हॅल्यू 0.99 एवढी होती. ही वाढून आता एक झाली आहे. व्हायरसच्या प्रजनन दरातील वाढ पाहता सतर्क होण्याची आवश्यकता आहे.
4 / 10
आर-व्हॅल्यूतील वाढीचा अर्थ, व्यक्तीपासून कोरोना संक्रमण पसरण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे, देशातील ज्या भागांत संक्रमणदर अधिक, त्या भागांत कठोर निर्बंध लावणे आवश्यक आहे.
5 / 10
डॉ. मांडे यांनी म्हटले आहे, की डेल्टा व्हेरिएंट विरोधात लस काम करत आहे, असे संशोधनातून समोर आले आहे. यामुळे सर्वांना आवाहन आहे, की त्यांनी लस टोचून घ्यावी. हाच जीवघेण्या व्हायरसपासून बचावाचा योग्य मार्ग आहे.
6 / 10
डॉ. मांडे म्हणाले, भारताने आधीच डेल्टा व्हेरिएंटचा सामना केला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटबद्दल फारशी काळजी करण्याची गरज नाही. इंग्लंड, युरोप आणि अमेरिकेने कोरोनाची पुढची लाट पाहिली आहे. मात्र, आपल्याला यापासूनही सतर्क रहावे लागेल. केरळमध्ये महामारीचा वेग अत्यंत तीव्र आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी साधारणपणे अर्धे रुग्ण एकट्या केरळमध्ये सापडत आहेत. संक्रमणाची चाल लक्षात घेता, केरळनंतर व्हायरस महाराष्ट्रात येतो आणि नंतर देशाच्या इतर भागात थैमान घालायला सुरुवात करतो.
7 / 10
कोरोना संक्रमण अधिक असलेल्या भागांवर लक्ष ठेवणे आवश्यक - डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे, की संक्रमणाचा अधिक प्रसार झालेल्या भागांत ट्रिपल-टी म्हणजेच टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिटच्या रणनीतीवर काम करावे लागेल. यामुळे कोरोनाची चैन तोडता येईल. कोरोनाचा ग्राफ याच पद्धतीने वाढत राहिल्यास येणाऱ्या काळात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.
8 / 10
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात एकूण 46 जिल्ह्यांत संक्रमण दर दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 54 जिल्ह्यांत हा दर पाच ते दहा टक्क्यांच्या मधे आहे.
9 / 10
अशा प्रकारे समजून घ्या आर-व्हॅल्यू - डॉ. गुलेरिया म्हणाले, गोवर अथवा चिकनपॉक्सची आर-व्हॅल्यू आठ अथवा याहून अधिक होती. याचा अर्थ एक व्यक्ती आठ अथवा त्याहून अधिक व्यक्तींना संक्रमित करत होता.
10 / 10
आता कोरोनादेखील त्याच मार्गाने चालला आहे. महामारीच्या दुसऱ्या लाटेत आपण पाहिले, की एका व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंब संक्रमित होत होते. असे चिकनपॉक्समध्ये व्हायचे, डेल्टा व्हेरिएंटमुळेही संपूर्ण कुटुंब संक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचे दिसून आले आहे, असेही गुलेरिया म्हणाले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसKeralaकेरळIndiaभारतAIIMS hospitalएम्स रुग्णालयdoctorडॉक्टर