Coronavirus tips to avoid backaches during working from home SSS
Coronavirus : वर्क फ्रॉम होम करताय?, मग अशी घ्या काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 3:57 PM1 / 12कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. घरी बसून काम करताना कशी काळजी घ्यायची जाणून घ्या.2 / 12वर्क फ्रॉम होममध्ये एकाच जागी बसून 8 ते 10 तास काम करावं लागत आहे. अशा वेळी शरीर किंवा पाठ दुखण्याची दाट शक्यता असते.3 / 12काम करताना बसण्यासाठी योग्य जागेची निवड करावी. साधारण ऑफिसमध्ये बसतो तसं खुर्चीवर बसून काम करा पाय जमिनीला टेकवून बसणं महत्त्वाचं आहे. आरामात बसून काम करा. 4 / 12बेडवर बसून काम करत असाल तर पाठीमागे सपोर्ट घेणं गरजेचं आहे. बसताना पाठीमागे उशी घ्या.5 / 12खाली मान घालून काम केल्यास मान दुखण्याची शक्यता दाट असते तसेच डोळेही दुखू शकतात त्यामुळे स्क्रिन आणि डोळ्यांची लेवल एक ठेवा. 6 / 12लॅपटॉपवर काम करताना हाताची पोझिशन नीट ठेवा. म्हणजे काम करायला सोपे जाईल आणि हातही दुखणार नाही. 7 / 12काम करताना अनेकदा ऑफिसमधील कर्मचाऱ्यांशी फोनवर बोलावं लागत त्यावेळी फोन नीट कानाला लावून बोला किंवा हेडफोन्सचा वापर करा. 8 / 12काम करताना खूप तास एकाच वेळी बसू नका. यामुळे अंग दुखू शकतं त्यामुळे मधेच पाय मोकळे करायला थोड चाला.9 / 12अनेकदा काम करताना लॅपटॉप मांडीवर ठेवला जातो. मात्र असं बसून काम करू नका. लॅपटॉप टेबलवर ठेवा किंवा मांडीवर घेण्याऐवजी त्याखाली उशी घ्या. 10 / 12काम करण्याची जागा निश्चित करा म्हणजे काम करायलाही उत्साह वाटेल. काम करताना जास्त ताण येणार नाही.11 / 12सतत लॅपटॉप अथवा फोनच्या स्क्रिनवर बघून डोळ्यांवर ताण येतो. डोळे दुखू लागतात त्यामुळे काम करताना डोळ्यांची विशेष काळजी घ्या. 12 / 12ऑफिसमध्ये काम करताना टी ब्रेक, लंच ब्रेक असतो. वर्क फ्रॉम होम करताना ही छोटा ब्रेक घ्या म्हणजे काम करताना कंटाळा येणार नाही. तसेच पोषक आहार घ्या. आणखी वाचा Subscribe to Notifications