Coronavirus tips to stay healthy during lockdown in house SSS
Coronavirus : घरी बसून कंटाळा आलाय? मग ‘या’ गोष्टी नक्की करा By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 5:23 PM1 / 13जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 21,000 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळेच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.2 / 13संपूर्ण भारतही 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडायला परवानगी नाही. घरी बसून काहींना कंटाळा आलाय. अनेकांमध्ये स्ट्रेसची समस्या पाहायला मिळत आहे. कसं आनंदी राहायचं हे जाणून घेऊया.3 / 13काम नसल्यावर घरी बसून राहणं अनेकांना कंटाळवाणं वाटत. अशावेळी आवडती गाणी ऐका म्हणजे मूड फ्रेश होईल.4 / 13गाणी ऐकताना रिलॅक्स होता येईल तसेच सर्व चिंता विसरून फक्त गाण्याचा आनंद घ्या म्हणजे खूप छान वाटेल.5 / 13कामाच्या गडबडीत छंद जोपासायला वेळच मिळत नाही. आपल्या आवडीची गोष्ट केल्यास समाधान मिळतं तसेच स्ट्रेस निघून जातो.6 / 13वाचनाची आवड असेल तर पुस्तक वाचू शकता, चित्र काढू शकता म्हणजे मनावरील ताण हलका होईल. 7 / 13लॉकडाऊनमुळे बाहेर फिरण्यास बंदी आहे त्यामुळे अशावेळी मित्रमैत्रिणीशी फोनवरून संवाद साधा, गप्पा मारा. 8 / 13कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून मित्रांसोबत धमाल करा म्हणजे मन प्रसन्न होईल.9 / 13व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत गरजेचा असतो. मात्र हल्ली कामामुळे वेळ मिळत नाही. मात्र सध्या असलेल्या वेळेत व्यायाम करा आणि टेन्शन फ्री जगा.10 / 13व्यायामामुळे शरीरावरचा आणि मनावरचा ताण हलका होतो. आरोग्य चांगले राहते. 11 / 13जेवणामध्ये नेहमी पोषक घटकांचा समावेश करा. हेल्दी डायट फॉलो करा.12 / 13झोप अपुरी झाल्यास अनेकदा त्रास होतो. त्यामुळे शांत झोपा म्हणजे काम करायला उत्साह येईल.13 / 13साधारण 7 ते 8 तासाची झोप दररोज अत्यंत आवश्यक आहे यामुळे शरीर उत्तम राहते. आणखी वाचा Subscribe to Notifications