शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोना रुग्णांचे जीव वाचवणार डेक्झामेथॅसोन; नक्की या औषधांचा कसा होतो परिणाम? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 10:07 AM

1 / 9
जगभरातील तज्ज्ञ कोरोना व्हायरसची लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत कोरोनाची लस किंवा कोणतंही औषध शोधण्यात आलेलं नाही. गंभीर आजारांत वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांवर केला जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या उपचारांसाठी सध्या डेक्सामेथॅसोन या औषधांचा वापर केला जाणार आहे. या औषधामुळे संक्रमणाची तीव्रता कमी होऊन मृत्यूदर कमी होण्याची शक्यता आहे.
2 / 9
शरीर कोरोना विषाणूंचा प्रवेश होतो. त्यानंतर व्हायरसची संख्या वाढत जाते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीचे डिफेंस मॅकेनिजम सक्रिय होते. त्यावेळी शरीरात असणारे इम्यूनिटी सेल्स व्हायरसचा प्रसार होत असल्याच्या सुचना देतात. त्यावेळी रोगप्रतिकारकशक्ती फायटर सेल्सची निर्मीती करते.
3 / 9
यादरम्यान शरीरातील सायटोकाईन्सचे प्रमाण वाढते. सायटोकाईन्स हे शरीरातील एक रसायन आहे. जे रसायन रोगप्रतिकारकशक्ती आणि पेशींची क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. जेव्हा साईटोकाईन्सचं शरीरातील प्रमाण वाढतं. तेव्हा इम्यून सेल्स आणि व्हायरस यांमध्ये लढाई सुरू असते. कारण त्यावेळी जास्त प्रमाणात सायटोकाईन्स जमा होते. जेणेकरून व्हायरसपासून शरीराचा बचाव करता येऊ शकतो.
4 / 9
कारण कोरोना व्हायरस सगळ्यात आधी फुफ्फुसांवर आक्रमण करतो. सायटोकाईन्स श्वसन तंत्रात जास्त प्रमाणात जमा होते. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये आणि श्वासनलिकांमध्ये सूज येते. ही सूज आल्यामुळे व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होतो. कारण ऑक्सिजनची कमतरता भासत असते. श्वास घ्यायला तीव्रतेने त्रास झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होतो.
5 / 9
शरीरातील सायटोकाईन्स पूर्ण शक्ती एकवटून व्हायरसशी सामना करतात. या स्थितीला साइटोकाइन्स स्ट्रोम असं म्हणतात. त्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. कारण सायकोकाईन्सचं जास्त प्रमाण शरीरासाठी नुकसानकारक ठरत असते.
6 / 9
ब्रिटेनच्या संशोधकांनी केलल्या दाव्यानुसार कोरोनाच्या उपचारांसाठी डेक्सामेथॅसोन महत्वपूर्ण आहे. कारणं या औषधामुळे शरीरातील सायटोकाईन्सना जास्त प्रमाणात निर्माण होण्यापासून रोखता येऊ शकतं. म्हणजेच शरीरात सायटोकाईन्स रिलीज झाल्यानंतर या औषधामुळे नियंत्रणात ठेवता येऊ शकतात.
7 / 9
जेणेकरून फुफ्फुसांना सूज येणार नाही तसंच रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होणार नाही. जेव्हा शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत असताना सायटोकाईन्स रिलीज होऊन व्हायरस मरतात. त्यावेळी रुग्णाची स्थिती चांगली राहते. रुग्ण कोरोनाच्या संक्रमणातून लवकर बाहेर येऊ शकतो.
8 / 9
डेक्झामेथॅसोनचे डोस कोरोना रुग्णांना ७ ते १० दिवसांच्या आत दिले जाते. रुग्णाच्या शारीरिक स्थितीवर औषधाचे प्रमाण ठरवण्यात येतं. हे औषध कोरोना रुग्णांना परवडण्यासारखं असल्यामुळे तज्ज्ञांकडून आनंद व्यक्त होत आहे. या औषधामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो. तसंच ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत हे औषध उपलब्ध होऊ शकते.
9 / 9
डेक्झामेथॅसोनचे डोस कोरोना रुग्णांना ७ ते १० दिवसांच्या आत दिले जाते. रुग्णाच्या शारीरिक स्थितीवर औषधाचे प्रमाण ठरवण्यात येतं. हे औषध कोरोना रुग्णांना परवडण्यासारखं असल्यामुळे तज्ज्ञांकडून आनंद व्यक्त होत आहे. या औषधामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो. तसंच ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत हे औषध उपलब्ध होऊ शकते.
टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य