शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : जेवढा विचार केला होता त्यापेक्षा दुप्पाट वेगाने पसरत आहे कोरोना, रिसर्चमधून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:09 AM

1 / 10
कोरोना व्हायरसवर जगभरातील देशात सतत वेगवेगळे रिसर्च वैज्ञानिक करत आहेत. दररोज वैज्ञानिक नवनवीन दावे करत आहेत. रोज नवीन माहिती समोर येत आहे. अशात आता एका रिसर्चमधून समोर आले आहे की, कोरोना व्हायरसबाबत आधी जेवढा अंदाज लावण्यात आला होतो, तो त्याच्या दुप्पट वेगाने पसरत आहे. चीनमधील वुहान शहरावर करण्यात आलेल्या रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे.
2 / 10
आधी अशी माहिती समोर आली होती की, कोरोना व्हायरसने संक्रमित एक रूग्ण साधारण 2.2 ते 2.7 लोकांना संक्रमित करू शकतो.
3 / 10
मात्र, आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसने संक्रमित एका व्यक्तीपासून 5.7 लोकांना याची लागण होऊ शकते. म्हणजे 6 लोकांना.
4 / 10
हा रिसर्च न्यू मेक्सिकोच्या लॉस अलामॉस नॅशनल लेबॉरेटरीने केलाय. या लेबॉरेटरीतील वैज्ञानिकांनी वुहानमध्ये झालेल्या संक्रमण पॅटर्नचा अभ्यास केला. यात सांगण्यात आलं आहे की, या शहरातून निघालेल्या व्हायरसने सरासरी एका व्यक्तीपासून 6 लोक आजारी झाले.
5 / 10
कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान सुरू आहे. याने 1 लाखांपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे. साधारण 17 लाख लोकांना याची लागण झाली आहे. पण पाच महिने होऊन गेले तरी या व्हायरसला रोखण्यासाठी औषध मात्र सापडलं नाहीये.
6 / 10
डेली मेलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, कोरोना व्हायरसने संक्रमित साधारण 82 टक्के लोकांनी आता या व्हायरससोबत लढण्याची रोगप्रतिकारकशक्ती विकसित केली आहे.
7 / 10
कोरोनाबाबत आधी एका रिसर्चमध्ये सांगण्यात आले होते की, पहिल्या 6 ते 7 दिवसात व्हायरस एखाद्या रूग्णातून निघून दुसऱ्या दोन किंवा तीन लोकांना संक्रमित करतो. पण तेव्हाही याबाबत इशारा देण्यात आला होता की, हा पसरण्याचा दर जास्त होऊ शकतो.
8 / 10
वैज्ञानिकांना माहिती मिळाली की, कोरोना व्हायरसने संक्रमित होणाऱ्या व्यक्तीचं शरीर 4.2 दिवसात लक्षणे दाखवू लागतं. तर आधी हे सांगण्यात आलं होतं की, लक्षणे 6.2 दिवसात दिसून येतात.
9 / 10
18 जानेवारीआधी चीनच्या हॉस्पिटलमध्ये जेवढे लोक भरती झाले, त्याच्यात लक्षणे दिसण्याचा दर 5.5 दिवस होता. प 18 जानेवारीनंतर ही लक्षणे दिसण्याचा कालावधी सरासरी कमी होऊन 1.5 दिवस इतका झाला होता.
10 / 10
लॉस अलामॉस नॅशनल लेबॉरेटरीच्या या रिसर्चमधून याचा खुलासा झाला की, हा व्हायरस एका रूग्णापासून केवळ 2 किंवा 3 लोकांना संक्रमित करत नाही तर 5 किंवा 6 लोकांना संक्रमित करू शकतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सchinaचीन