CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 8:27 PM
1 / 10 देशभरात कोरोनाने कहर केला आहे. कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याचे मुख्य कारण, 10 राज्यांत डबल म्यूटेंट व्हायरस सक्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे. खरे तर, वैज्ञानिकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात जीनोम सिक्वेंसिंगचा रिपोर्ट तयार केला आहे. यात, दोन एप्रिलपूर्वी 60 दिवसांत करण्यात आलेल्या जिनोम सिक्वेंसिंगमध्ये कोरोनाचा डबल म्यूटेन्ट व्हेरिएंट सर्वाधिक दिसून आला आहे. (CoronaVirus update covid 19 double mutant variant coronavirus new strain) 2 / 10 दरम्यान, केवळ डबल म्यूटेंटलाच दुसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे जबाबदार ठरविले जाऊ शकत नाही, असे आरोग्य मंत्रालयाने नुकतेच म्हटले होते. रिपोर्ट्सनुसार, हा नवा व्हेरिएंट आतापर्यंत जगातील जवळपास 10 देशांत दिसून आला आहे. तर जाणून घेऊया, हा डबल म्यूटेंट व्हेरिएंट नेमका आहे तरी काय आणि किती आहे घात? 3 / 10 काय आहे डबल म्यूटेंट व्हेरिएंट? जेव्हा कोरोना व्हायरसचे दोन बदललेले व्हेरिएंट एकमेकांच्या संपर्कात येतात आणि त्यापासून एक नवा आणि तिसराच व्हेरिएंट तयार होतो, तेव्हा त्यालाच डबल म्यूटेंट व्हेरिएंट म्हटले जाते. 4 / 10 भारतात कोरोनाच्या E484Q आणि L452R व्हेरिएंटने एकत्र येऊन डबल म्यूटेंट व्हायरस तयार केला आहे. याला वैज्ञानिक भाषेत B.1.617 असे नाव दिले आहे. 5 / 10 भारतात 'या' ठिकाणी सापडलाय डबल म्यूटेंट व्हेरिएंट - कोरानाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट देशातील, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेशात अधिक प्रमाणावर आणि अधिक वेगाने पसरत आहे. 6 / 10 या राज्यात या व्हायरसने घातक रुप धारण केले आहे. असे मानले जाते, की दिल्लीत डबल म्यूटेंट आणि कोरोनाचा ब्रिटेन व्हेरिएंट दोन्हीही थैमान घालत आहेत. तर महाराष्ट्रातही याच दोन्ही व्हेरिएंट्सचा कहर सुरू असल्याचे बोलले जात आहे. 7 / 10 किती घातक आहे, डबल म्यूटेंट व्हेरिएंट? आरोग्य मंत्रालयाने गेल्या महिन्यातच सांगितले होते, की कोरोनाचा हा डबल म्यूटेंट व्हेरिएंट संक्रमक आणि शरीरातील इम्यून सिस्टम अर्थात रोग प्रतिकारक तंत्रापासूनही सुरक्षित राहण्यास सक्षम आहे. हा व्हायरस शरीरातील रोगप्रितिकारक तंत्रापासून सुरक्षित राहून संक्रमकता वाढवतो. मात्र, यावर अँटीबॉडीज कितपत प्रभावी ठरतात, याचा संशोधक शोध घेत आहेत. 8 / 10 डबल म्यूटेंट व्हेरिएंट व्हायरल लोड वाढवतात - तज्ज्ञांच्या मते, अनेक वेळा म्यूटेट झाल्यानंतर व्हायरस कमजोर होतो. मात्र, अनेक वेळा तो आधीपेक्षाही घातक होतो. व्हायरस जेव्हा शरीरातील पेशींवर हल्ला करतो, तेव्हा पेशी काही तासांतच व्हायरसच्या हजारो डुप्लिकेट्स तयार करतात. यामुळे व्हायरस लोड वाढतो आणि संक्रमित रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचतात. 9 / 10 डबल म्यूटेंट व्हेरिएंटवर कोरोना लस कितपत परिणामकारक? यासंदर्भात अद्याप काहीही सांगितले जाऊ शकत नाही. कारण, कोरोना लस डबल म्यूटेंटवर परिणाम कारक आहे, की नाही, यावर सध्या संशोधन सुरू आहे. मात्र, असे मानले जाते, की भारतातील कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या व्हेरिएंटविरोधात प्रभावशाली आहे. 10 / 10 अशी घ्या खबरदारी आणि कोरोनापासून करा स्वत:चा बचाव - मास्क लावा, वारंवार हात धुवा अथवा सॅनिटायझरचा वापर करा, कुणी खोकलत अथवा शिंकत असेल तर त्याच्या पासून योग्य अंतर ठेवा, योग्य शारीरिक अंतर ठेवा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा, आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर घरीच थांबा, तब्बेतीसंदर्भात कसल्याही प्रकारची समस्या जाणवत असेल तर तत्काल डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणखी वाचा