Coronavirus vaccination in India : Know How vaccine efficacy rate is determined expert explain
Corona vaccine: एखाद्या वॅक्सीनच्या एफिकेसी रेटचा काय अर्थ होतो? जाणून घ्या काय आहे गणित... By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 9:19 AM1 / 10 भारतात आजपासून(१६ जानेवारी २०२०) ला कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनेशनच्या अभियानाला सुरू झाली आहे. याची सुरूवात कोविशील्ड आणि कोवॅक्सीनसोबत केली जात आहे. भारतात दोन वॅक्सीनसोबत वॅक्सीनेशन अभियानाला सुरूवात केली जात आहे. एक आहे कोविशील्ड आणि दुसरी कोवॅक्सीन. 2 / 10सीरम इन्स्टिट्यूटने कोविशील्डचे दोन डोज दिल्यानंतर एफिकेसी दर ६२ टक्के सांगितला आहे. तेच भारत बायोटेककने एफिकेसी रेट डेटा जाहीर न केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण हा एफिकेसी रेट काय असतो? तो कसा ठरवला जातो? चला तेच जाणून घेऊ...3 / 10Pfizer आणि BioNTech ने आपल्या वॅक्सीनचा एफिकेसी रेट ९५ टक्के असल्याचं सांगितलं आहे. तर रशियातील Sputnik आणि अमेरिकेतील Moderna चा एफिकेसी रेट ९० ते ९४.५ टक्के सांगण्यात आला आहे.4 / 10मेयो क्लीनिकल वॅक्सीन डेव्हलपर डॉ. ग्रेगरी पॉलॅंड वॅक्सीनच्या या शानदार एफिकेसी रेटला गेम चेंजर मानतात. त्यांचं म्हणणं आहे की, ते तर केवळ ५० ते ७० टक्के एफिकेसी रेटची अपेक्षा करत होते. तर फूड अॅन्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने म्हणजे एफडीएने अशा वॅक्सीनला इमरजन्सी मंजूरी देण्याबाबत सांगितलं होतं ज्यांचा एफिकेसी रेट कमीत कमी ५० टक्के असेल.5 / 10एक्सपर्ट सांगतात की, ९० टक्के एफिकेसी रेटसोबत या वॅक्सीन आदर्श वॅक्सीन म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मात्र, ९० टक्के एफिकेसी रेटचा हा अर्थ नाही की, जर १०० लोकांना वॅक्सीन दिली गेली तर ९० टक्के लोकांवर प्रभावी ठरेल. चला जाणून घेऊन एफिकेसी रेट कसा ठरवला जातो.6 / 10जवळपास १०० वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी वॅक्सीन ट्रायलचे काही नियम बनवले होते. या प्रक्रियेनुसार ट्रायलमध्ये काही वॉलेंटिअर्सना खरी वॅक्सीन दिली जाते आणि काही लोकांना प्लेसिबो म्हणजे आर्टिफिशिअल वॅक्सीन दिली जाते. यानंतर वैज्ञानिक बघतात की, कोणत्या गटातील किती लोक आजारी झाले.7 / 10उदाहरणार्थ फायजरने ४८६६१ लोकांना परीक्षणात सहभागी करून घेतलं होतं. ज्यातील १७० लोकांमध्ये कोविड-१९ ची लक्षणे आढळून आली. इथे १७० वॉलेंटिअर्सपैकी केवळ ८ लोकांना खरी वॅक्सीन देण्यात आली होती. तर १६२ लोकांना प्लेसिबो(रूग्णांना न सांगता दिलं जाणारं आर्टिफिशिअल लसीकरण) दिलं गेलं. फायजरच्या वैज्ञानिकांनी दोन्ही ग्रुपमधील अशा लोकांची विभागणी केली जे आजारी पडले होते.8 / 10हे दोन्ही समूह फार छोटे होते. मात्र, ज्या लोकांना खरी वॅक्सीन देण्यात आली होती, त्यांच्या तुलनेत आर्टिफिशिअल वॅक्सीन घेतलेले लोक जास्त आजारी पडले. याच आधारावर वैज्ञानिकांनी दोन्ही समूहात वॅक्सीनच्या प्रभावाला रेखांकित केलं. दोन्ही समूहात जे अंतर दिसतं यालाच वैज्ञानिक एफिकेसी(प्रभावकारिता) म्हणतात. दोन्ही समूह ज्यांना खरी वॅक्सीन देण्यात आली आणि ज्यांना खोटी वॅक्सीन देण्यात आली जर यांच्यात काहीच फरक नसता तर वॅक्सीन बेकार मानली गेली असती. एफिकेसी रेट वॅक्सीन दिल्या गेल्या लोकांमध्ये, दिल्या न गेलेल्या लोकांमधील जोखिम याच्याशी तुलना करून ठरवला जातो.9 / 10जॉन्स होपकिन्स ब्लूमबर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे एपिडेमिओलॉजिस्ट नोआर बार जीव सांगतात की, 'प्रभावकारिता(एफिकेसी) आणि प्रभावशीलता एकमेकांशी कनेक्टेड आहे. पण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. एफिकेसी एक माप आहे, जे क्लीनिकली ट्रायल दरम्यान तयार केलं जातं. तर इफेक्टिवनेसचा अर्थ हा आहे की, जगभरात वॅक्सीन कसं काम करत आहे'.10 / 10जॉन्स होपकिन्स ब्लूमबर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे एपिडेमिओलॉजिस्ट नोआर बार जीव सांगतात की, 'प्रभावकारिता(एफिकेसी) आणि प्रभावशीलता एकमेकांशी कनेक्टेड आहे. पण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. एफिकेसी एक माप आहे, जे क्लीनिकली ट्रायल दरम्यान तयार केलं जातं. तर इफेक्टिवनेसचा अर्थ हा आहे की, जगभरात वॅक्सीन कसं काम करत आहे'. आणखी वाचा Subscribe to Notifications