Coronavirus vaccine children more infectious says wuhan study
चिंताजनक! लसीकरणाला सुरूवात होताच कोरोना लसीबाबत चीनी वैज्ञानिकांचा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 12:58 PM1 / 10अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळत आहे. सगळ्या ठिकाणी लहान मुलं आणि कमी वयातील मुलांना शेवटच्या टप्प्यात लस दिली जावी अशी चर्चा असताना वुहानच्या संशोधकांनी दावा केला आहे की, सगळ्यात आधी लहान मुलांना लस दिली जावी जे ही लस घेण्यास पात्र आहेत त्यांचे लसीकरण व्हावे. 2 / 10संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये मोठ्यांच्या तुलनेत कोरोनाचा व्हायरसचा धोका कमी आहे. पण वयस्कर लोकांच्या तुलनेत लहान मुलं अधिक संक्रमण पसरवू शकतात. घराघरांतील संक्रमण रोखण्यासाठी अशा मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यायला हवं जे यासाठी पात्र आहेत. याशिवाय त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांनाही कोरोनाची लस द्यायला हवी. 3 / 10चीन आणि अमेरिकेतील २० हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना या अभ्यासात सहभागी करून घेण्यात आलं होतं. द लॅसेंट या वैद्यकिय नियतकालिकात हा अभ्यास छापण्यात आला आहे.4 / 10संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार शाळा पुन्हा सुरू करण्याआधी कोरोना व्हायरसच्या संक्रामकतेबाबत समजून घेणं गरजेचं आहे. जगभरात लसीकरणाला सुरूवात झाली आहे म्हणून हा रिसर्च महत्वाचा मानला जात आहे. 5 / 10वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशनद्वारे कोरोनाची लक्षणं असलेल्या आणि लक्षणं नसलेल्या लोकांवर हा रिसर्च करण्यात आला होता. घरात होणाऱ्या कोरोना संक्रमणासाठी सगळ्यात जास्त जबाबदार कोणं असतं. हे जाणून घेणं हा या अभ्यासामागचा उद्देश होता.6 / 10या रिसर्चमध्ये दिसून आलं की घरात राहणारे आणि कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा सामना करणाऱ्या वयस्कर लोकांच्या तुलनेत लहान मुलांमधून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो. 7 / 10या अभ्यासात दिसून आले की, प्री सिम्टोमॅटीक लोक अधिक संक्रामक असतात. कोरोना व्हायरसची लक्षणं असलेले लोक इन्क्यूबेशन काळात अधिक संक्रामक असतात. 8 / 10. या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार आयसोलेशन आणि क्वारंटाईनचे महत्व वाढवणं गरजेचं आहे. 9 / 10या अभ्यासात दिसून आले की, प्री सिम्टोमॅटीक लोक अधिक संक्रामक असतात. कोरोना व्हायरसची लक्षणं असलेले लोक इन्क्यूबेशन काळात अधिक संक्रमण पसरवत असतात. या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार आयसोलेशन आणि क्वारंटाईनचे महत्व वाढवणं गरजेचं आहे. 10 / 10या अभ्यासानुसार ०-१ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये, २-५ वयोगटातील मुलांच्या तुलनेत दुप्पट आणि ६- १२ वर्ष वयोगटातील लहान मुलांमध्ये ५३ टक्के अधिक संक्रमणाची शक्यता होती. अभ्यासानुसार लहान मुलांच्या तुलनेत मोठ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं वेगानं विकसित होतात. पण गंभीर आजार होण्याची शक्यता कमी असते. आणखी वाचा Subscribe to Notifications