Coronavirus : Vaccine could be ready for september says scientist api
Coronavirus : 'या' महिन्यापर्यंत वॅक्सीन तयार होणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा, पण तोपर्यंत काय? By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 2:05 PM1 / 9कोरोना व्हायरसमुळे जगभरात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या महामारीमुळे आतापर्यंत जगभरात 1 लाखांपेक्षा लोकांचा जीव गेला आहे. वैज्ञानिक अनेक दिवसांपासून कोविड-19 वर वॅक्सिन शोधण्यावर काम करत आहेत. इतक्या संशोधनांनंतर आता कुठे वैज्ञानिकांना आशेची एक किरण दिसली आहे.2 / 9ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये वॅक्सीनोलॉजी डिपार्टमेंटच्या प्रोफेसर साराह गिल्बर्ट यांनी दावा केला आहे की, त्यांची टीम लवकर कोरोना व्हायरसवर वॅक्सीन तयार करेल.3 / 9साराह यांनी सांगितले की, पुढील 15 दिवसांच्या आत त्यांची टीम या वॅक्सीनचा प्रयोग मनुष्यांवर करणार आहे. या वॅक्सीनबाबत ते 80 टक्के गॅरंटी घेत आहेत. (Image Credit : naidunia.com) 4 / 9जर या प्रयोगातून चांगले परिणाम समोर आले तर सरकार यासाठी निश्चितपणे फंड जारी करेल, याचेही संकेत आले आहेत. जर सगळं काही ठिक झालं तर ही वॅक्सीन सप्टेंबरपर्यंत तयार होऊ शकते.5 / 9पण जेव्हा एखाद्या वॅक्सीनचं यशस्वीपणे आविष्कार होऊ शकत नाही. तोपर्यंत लोकांनी सोशल डिस्टंसिंग आणि सुरक्षित राहण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे.6 / 9प्राध्यापिका साराह यांनी सांगितले की, ही वॅक्सीन यशस्वी होण्याची फार जास्त अपेक्षा आहे. याचे लवकरच काही सेफ्टी ट्रायल घेतले जातील.7 / 9साराहने सांगितले की, लॉकडाऊनमुळे ट्रायल करण्यात काही अडचणी येत आहेत. पण लॉकडाऊनमुळे कोरोनाची गति कमी झाली आहे. काही भागात तो वेगाने पसरत आहे.8 / 9दरम्यान कोरोनामुळे सर्वात जास्त फटका बसणाऱ्या देशांमध्ये ब्रिटनदेखील आहे. इथे आतापर्यंत 70 हजार केसेस समोर आल्या आहेत.9 / 9तसेच इथे कोरोनामुळे 9 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत सर्वात जास्त मृत्यू इटली, अमेरिका आणि स्पेनध्ये झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications