CoronaVirus vaccine immunity erupts lancet report sparks concern need of booster dose
Corona Vaccine: मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी? द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 4:13 PM1 / 10कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी आहे, याच बरोबर लसीपासून तयार झालेली अँटीबॉडी कधीपर्यंत राहील. यासंदर्भात वेळोवेली प्रश्न उपस्थित होत आहेत. याच संदर्भात आता द लॅंसेटचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. (CoronaVirus vaccine immunity erupts lancet report sparks concern need of booster dose)2 / 10कोरोना लसीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या द लॅंसेटच्या रिपोर्टमध्ये फायझर आणि एस्ट्राजेनेका लसींचा डोस घेतल्यानंतर अँटीबॉडी सहा आठवड्यांनंतर कमी व्हायला सुरुवात होते आणि 10 आठवड्यात 50 टक्क्यापेक्षाही कमी होते, असे सांगण्यात आले आहे.3 / 10हा रिपोर्ट आल्यानंतर, कोरोना विरोधात लसीचे दोन डोसही पुरेसे नाहीत का? बूस्टर डोसची आवश्यकता पडणार का? आणि असे असेल तर किती दिवसांनंतर घ्यावा लागेल? अशी चर्चाही सुरू झाली आहे.4 / 10द लँसेटच्या रिपोर्टनंतर लसीशी संबंधित प्रश्नांवर तज्ज्ञांची मते भिन्न आहेत. ICMR महामारी विज्ञान विभागाचे संस्थापक- निदेशक डॉक्टर मोहन गुप्ते यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना म्हटले आहे, की अँटीबॉडी आणि नव्या व्हेरिएंटवर लक्ष ठेवावे लागेल. ते म्हणाले, बुस्टर डोसची गरज 6 महिने अथवा 1 वर्षाच्य आत पडणार नाही.5 / 10आयसीएमआरमधील माजी वैज्ञानिक आणि एम्सचे माजी डीन डॉ. एनके मेहरा यांनी म्हटले आहे, की प्रत्येक डोस नंतर, इम्यून मेमरी सक्रिय राहते. रिपोर्टवरून या गोष्टींची पुष्टीही होते, की लसीचे दोन डोस घेतल्यानंतर दीर्घ काळ संरक्षण मिळेल.6 / 10लेखक, डॉक्टर आनंद रंगनाथन यांनी म्हटले आहे, की लसीकरणानंतर अँटीबॉडी गायब होणे चिंताजनक आहे. मात्र, हे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती प्रणालीची पूर्णपणे लढण्याची क्षमता दर्शवत नाही.7 / 10बूस्टर डोसची आवश्यकता सर्वप्रथम कुणाला - तज्ज्ञांच्या मते, जे लोक वैद्यकीय दृष्ट अधिक कमजोर आहेत, ज्यांचे वय 70 वर्ष अथवा त्याहून अधिक आहेत, तसेच अशी घरं जेथे वृद्धांची देखभाल होत आहे. त्या सर्वांना बुस्टर डोस द्यायला हवा.8 / 10बूस्टर डोस म्हणजे, जो एखाद्या विशिष्ट रोगाविरुद्ध व्यक्तीची इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी दिला जातो. 9 / 10बूस्टर डोस शरिरात तत्काळ इम्यून सिस्टम अॅक्टिव्ह करतो. ती इम्यूनोलॉजिकल मेमरीच्या आधारे काम करते. 10 / 10महत्वाचे म्हणजे अद्याप WHOने बूस्टर डोसला परवानगी दिलेली नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications