Coronavirus Vaccine : Know who can and cant safely get the covid 19 vaccine
Coronavirus Vaccine: 'या' लोकांनी दहा वेळा विचार करूनच घ्यावी कोरोना वॅक्सीन.... By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 9:06 AM1 / 10जगभरात कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये आता काही प्रमाणात घट होत आहे. तेच दुसरीकडे अनेक देशांमध्ये लोकांना वॅक्सीन देण्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. फायजर-बायोएनटेक, मॉडर्ना, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका सारख्या वॅक्सीन ट्रायलमध्ये सफल झाल्या आहे आणि यांमध्ये फार कमी साइड इफेक्ट आढळले आहेत. तेच भारतात कोवीशिल्ड आणि कोवॅक्सीनच्या ट्रायलच्या चांगल्या रिझल्टनंतर यांच्या इमरजन्सी वापराला मंजूरी देण्यात आली आहे.2 / 10तशी तर कोरोना व्हायरसच्या सर्व वॅक्सीन लोकांसाठी सुरक्षित आहेत. पण काही लोकांना फार विचार करून ही वॅक्सीन घेण्याचा सल्ला दिला जात आहे. चला जाणून घेऊ कोणत्या लोकांना कोरोना व्हायरसची वॅक्सीन घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.3 / 10एलर्जी असलेले लोक - अमेरिकेतील सीडीसीनुसार, फायजर आणि मॉडर्नाच्या वॅक्सीनमुळे अनेक लोकांमध्ये गंभीर एलर्जी आढळून आली आहे. एक्सपर्ट सांगतात की, वॅक्सीन घेतल्यावर छोट्या-मोठ्या समस्या सामान्य बाब आहे. पण एनाफिलेक्सिससारखी एलर्जी घातक ठरू शकते. CDC ने सल्ला दिला आहे की, वॅक्सीनमध्ये असलेल्या कोणत्याही इनग्रेडिएंट्समुळे कुणाला एलर्जी असेल तर त्यांनी ही वॅक्सीन घेऊ नये.4 / 10जर कुणाला इंजेक्शन घेतल्यावर गंभीर एलर्जीची समस्या असेल तर त्यांनीही कोरोना वॅक्सीन घेण्याआधी आपल्या डॉक्टरांशी बोलायला हवं. जर एखाद्या व्यक्तीला कोविड-१९ वॅक्सीनच्या पहिल्या डोजने गंभीर एलर्जी होत असेल CDC ने त्यांना दुसरा डोज न घेण्याचा सल्ला दिला. 5 / 10प्रेग्नेंट आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिला - गर्भवती किंवा ब्रेस्ट फीड करणाऱ्या महिलांनी कोरोना वॅक्सीन घेण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गर्भवती महिलांमध्ये कोविड-१९ वॅक्सीनच्या सुरक्षेबाबबत कोणताही डेटा नाही. कारण त्यांना क्लीनिकल ट्रायलमधून बाहेर ठेवण्यात आलं होतं. 6 / 10असं असलं तरी अमेरिकेतील काही हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, प्रेग्नेंट महिलांमध्ये कोरोनामुळे जास्त आजारी पडण्याचा धोका असतो. भलेही प्रेग्नेंट महिलांबाबतचा वॅक्सीन डेटा उपलब्ध नाही. पण याने कोरोनापासून सुरक्षा मिळते आणि कोरोनामुळे पडणाऱ्या वाईट प्रभावांमुळे यापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांशी चर्चा करून प्रग्नेंट महिला वॅक्सीन घेऊ शकतात. तेच CDC ने सांगितलं की, ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिलांमध्ये-मुलांमध्ये वॅक्सीनचा कोणताही प्रभाव आढळून आला नाही.7 / 10कोरोना पॉझिटिव्ह लोक - क्लीनिकल ट्रायलमध्ये सर्व वॅक्सीन त्या लोकांवर सुरक्षित आढळून आल्या जे आधीच कोरोनाने संक्रमित आहे. CDC ने सांगितलं की, कोरोनाने संक्रमित व्यक्तीला वॅक्सीन तोपर्यंत दिली जाऊ नये जोपर्यंत तो आयसोलेशन आणि या महामारीतून पूर्णपणे बाहेर येत नाही. तेच अॅंटीबॉडी थेरपी थेरपी घेणाऱ्यांना ३ महिन्यांनंतर वॅक्सीन दिली जावी.8 / 10काही आजार असलेले लोक - क्लीनिकल ट्रायलनुसार, वॅक्सीन मेडिकल कंडीशन असलेल्या लोकांवर तसाच प्रभाव करते जेवढा निरोगी लोकांवर. कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील संक्रामक रोगांचे प्रमुख डॉक्टर डीन ब्लमबर्ग यांनी हेल्थलाइनला सांगितले की, 'आमच्याकडे इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड किंवा एचआयव्ही रूग्णांचा डेटा नाही. पण आम्हाला माहीत आहे की, या लोकांना कोरोनाचा धोका गंभीर होऊ शकतो. त्यामुळे हे लोकही वॅक्सीन घेऊ शकतात. पण हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असेल आणि त्यांनी वॅक्सीन घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा'.9 / 10लहान मुले - मॉडर्ना वॅक्सीन १८ वर्षे आणि त्यावरील वयाच्या लोकांसाठी आहे. तेच फायजर वॅक्सीन १६ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी अधिकृत औषध आहे. तसेच भारत बायोटेकची वॅक्सीन १२ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाऊ शकते. तर कोविशील्डचा वापर १८ आणि त्यापेक्षा जास्त वय असलेले लोक करू शकतात. लहान मुलांवर कोविड १९ वॅक्सीनचा अभ्यास करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना वॅक्सीन देण्याची परवानगी दिली गेली नाही.10 / 10या लोकांना आधी दिली जाणार वॅक्सीन - भारतात १६ जानेवारीपासून वॅक्सीनेशन अभियानाला सुरूवात होणार आहे. या वॅक्सीनेशन ड्राइव्हमध्ये सर्वातआधी डॉक्टर, हेल्थकेअर वर्कर, सफाई कर्मचारीसहीत सर्वच फ्रंटलाइन वर्कर्सना प्राथमिकता दिली जाणार. त्यानंतर ५० पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना आणि गंभीर आजाराशी लढत असलेल्या लोकांना वॅक्सीन दिली जाणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications