शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना जीवनदान देणाऱ्या 'डेक्झामेथॅसोन' औषधाबाबत WHO काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:18 AM

1 / 10
कोरोना व्हायरसवर डेक्झामेथॅसोन औषधाच्या ट्रायलच्या सुरूवातीच्या निष्कर्षाचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने स्वागत केलं आहे. ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीकडून डेक्झामेथॅसोन औषधाची साधारण 2 हजार रूग्णांवर ट्रायल घेण्यात आली होती.
2 / 10
ट्रायलमधून समोर आले की, या औषधाने अनेक कोरोना रूग्णांचा जीव वाचवण्यात यश आलंय. वैज्ञानिकांनी सांगितले की, डेक्सामेथासोन पहिलं असं औषध आहे जे कोरोना रूग्णांचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरत आहे.
3 / 10
ब्रिटन सरकारने डेक्झामेथॅसोन औषधाने कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. हे एक जुनं आणि स्वस्त औषध आहे.
4 / 10
रिसर्च टीमचे मुख्य प्राध्यापक मार्टिन लॅंड्रे म्हणाले की, जिथेही शक्य आणि योग्य ठरेल कोणताही उशीर न करता हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रूग्णांना हे औषध दिलं जावं. पण लोकांनी स्वत: हे औषध खरेदी करून खाऊ नये.
5 / 10
डेक्झामेथॅसोन औषधाने खासकरून व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन सपोर्टवर असणाऱ्या लोकांना फायदा होत आहे. पण हलकी लक्षणे असलेल्या रूग्णांना या औषधाचा फायदा होत असल्याचा कोणताही पुरावा नाही.
6 / 10
WHO चे डायरेक्टर जनरल टेड्रोस एडहॅनम घेब्रियेसुस म्हणाले की, 'हे पहिलं असं औषध आहे ज्याने ऑक्सिजन आणि व्हेटिंलेटर सपोर्टवर राहणाऱ्या लोकांच्या मृत्यु दरात कमतरता येताना दिसत आहे. ही फार चांगली बातमी आहे. मी ब्रिटन सरकार, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि इतर लोकांचं अभिनंदन करतो'.
7 / 10
या औषधाच्या ट्रायलदरम्यान समोर आले की, व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रूग्णांना हे औषध दिलं गेल्यावर मृत्युचा धोका एक तृतीयांश कमी झाला. ज्या रूग्णांना ऑक्सिजन सप्लायची गरज असते, त्यांचा या औषधाने मृत्युचा धोका 1/5 पटीने कमी झाला.
8 / 10
वैज्ञानिकांचा अंदाज आहे की, जर ब्रिटनमध्ये हे औषध आधीच उपलब्ध झालं असतं तर कोरोनाने 5 हजार लोकांचा जीव वाचवला जाऊ शकला असता. कारण हे औषध स्वस्तही आहे.
9 / 10
ब्रिटीश ट्रायलचे मुख्य वैज्ञानिक प्राध्यापक पीटर हॉर्बी म्हणाले की, आतापर्यंतचं हे एकमेव औषध आहे ज्याने मृत्युदर कमी करण्यात यश मिळालं आहे. ही एक मोठी सफलता आहे.
10 / 10
मुख्य वैज्ञानिक प्रा. मार्टिन लॅंड्रे यांनी रिसर्चच्या हवाल्याने सांगितले की, या औषधाने व्हेंटिलेटरवर असलेल्या प्रत्येकी 8 रूग्णांपैकी एकाचा जीव वाचवत आहे. तेच ऑक्सिजन सपोर्ट असलेल्या प्रत्येक 20 ते 25 रूग्णांपैकी एकाचा जीव वाचवण्यात यश येत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय