शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: कोरोनाचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट आढळला; वैज्ञानिकांचा शोध, जाणून घ्या R.1 बद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 5:47 PM

1 / 11
गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीनं साऱ्या जगासमोर संकट उभं केले आहे. कोरोनानं आतापर्यंत लाखो लोकांचे जीव घेतले आहे. आजही अनेकजण कोरोना संक्रमणाच्या दहशतीखाली जगत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.
2 / 11
कोरोना(Coronavirus) महामारीत येणाऱ्या विविध व्हेरिएंटनं संक्रमणाचा धोका वाढवला आहे. यातच आता आणखी एक व्हेरिएंट समोर आल्यानं तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. अलीकडेच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं जगभरातील अनेक देशात शिरकाव केल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनेनं सांगितलं आहे.
3 / 11
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या टीमनं एक नव्या आणि धोकादायक व्हेरिएंटबाबत लोकांना सतर्क केले आहे. मागील काही दिवसांत संयुक्त राज्य अमेरिकेत कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट R.1 सापडला असल्याने काळजी वाढली आहे.
4 / 11
वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, सध्या या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण अत्यंत कमी आहेत. परंतु लोकांनी विशेष काळजी बाळगणं गरजेचे आहे. ज्याप्रकारे हा नवा व्हेरिएंट आढळला आहे तो खूप संक्रमित असू शकतो असं वाटत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट R.1 बद्दल जाणून घेऊया
5 / 11
रिपोर्टनुसार, कोरोनाचा व्हेरिएंट R.1 हा नवा नाही. मागील वर्षी सर्वात आधी जपानमध्ये या व्हेरिएंटची ओळख झाली होती. त्यानंतर हा व्हेरिएंट जगातील अन्य देशात वाढत आहे. आतापर्यंत संयुक्त राज्य अमेरिकेतील जवळपास ३५ देशात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहे.
6 / 11
मिळालेल्या माहितीनुसार, जगातील १० हजारापेक्षा अधिक रुग्ण या व्हेरिएंटच्या विळख्यात अडकले आहेत. आजार, नियंत्रण आणि बचाव केंद्र सीडीसीच्या आठवड्याच्या रिपोर्टमध्ये कोरोनाचा हा व्हेरिएंट धोकादायक असू शकतो. परंतु ज्या लोकांचं लसीकरण झालं आहे. त्यांच्यावर या व्हेरिएंटचा परिणाम कमी होईल अशी दिलासादायक माहिती आहे.
7 / 11
व्हेरिएंटबाबत अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी सांगितले आहे की, R.1 सार्स सीओवी २ व्हायरसचा नवा व्हेरिएंट आहे ज्यात अनेक म्यूटेशन पाहायला मिळतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर कुठल्याही नव्या स्ट्रेनप्रमाणे R.1 मूळ कोरोना व्हायरसच्या तुलनेत लोकांना वेगळ्या प्रकारे संक्रमित करू शकतं.
8 / 11
या व्हेरिएंटच्या प्रकाराला पाहता हा अधिक संक्रमित करू शकतो. सध्या यावर आणखी अभ्यास आणि रिसर्च बाकी आहे. सीडीसीनं आतापर्यंत याला व्हेरिएंट ऑफ कंसर्न अथवा इंटररेस्टच्या गटात सामील केले नाही. सध्या यावर संशोधक अभ्यास करत आहेत.
9 / 11
मागील काही महिन्यात कोरोनाचे अधिकाधिक रुग्ण या व्हेरिएंटचे आढळून आलेत. शरीरात बनलेल्या अँन्टीबॉडीवर ते परिणाम करू शकतात. कुठलाही व्हेरिएंट लसीच्या सुरक्षेपासून वाचू शकतो की नाही हे त्यात उपलब्ध असणाऱ्या म्यूटेशनच्या सेटवर अवलंबून आहे.
10 / 11
R.1 व्हेरिएंटवर आतापर्यंत केलेल्या रिसर्चनुसार शरीरात व्हॅक्सिनमुळे तयार झालेल्या रोगप्रतिकार शक्तीवर सहजपणे मात देऊ शकतो. परंतु याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रिसर्च आणि अभ्यास करणं बाकी आहे. त्यामुळे ठोस काही सांगता येत नाही.
11 / 11
R. 1 व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत संशोधकांकडून अभ्यास केला जात आहे. कोरोनाच्या अन्य व्हेरिएंटमध्ये जे लक्षण आढळले होते तसेच लक्षण या व्हेरिएंटमध्ये दिसून येत आहेत. सध्या तरी नव्या व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करणं गरजेचे आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या