शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : ...म्हणून निरोगी लोकांना कोरोना व्हायरसने केलं जाणार संक्रमित? WHO कडून परवानगी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 1:29 PM

1 / 10
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एका अशा वादग्रस्त ट्रायलला परवानगी दिली आहे ज्यात निरोगी किंवा कोरोना लागण न झालेल्या लोकांना कोरोनाने संक्रमित केलं जाईल. यादरम्यान वॉलेंटिअर्स म्हणून काम करणारे लोक गंभीर रूपाने आजारी पडण्याचा धोकाही असेल.
2 / 10
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, WHO कडून सांगण्यात आले आहे की, हेल्दी वॉलेंटिअर्सना कोरोना संक्रमित केल्याने वॅक्सीन तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळेल.
3 / 10
हेल्थ ऑर्गनायझेशनने याच कारणाने या गोष्टीला नैतिक रूपाने योग्य मानलं आहे.
4 / 10
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने व्रक्सीन ट्रायलबाबत आठ अटी ठरवलेल्या आहेत. यानुसार, केवळ 18 ते 30 वर्षे वयोगटातील लोकांनाच यात सहभागी करून घेतलं जाईल.
5 / 10
निरोगी लोकांना संक्रमित केल्यानंतर त्यांच्यावर वॅक्सीनचा प्रभाव बघण्याला चॅलेंज ट्रायलही म्हणतात. मलेरिया, टायफॉईड, फ्लूची वॅक्सीन तयार करण्यासाठीही असे प्रयोग करण्यात आले आहेत.
6 / 10
मात्र, या आजारांवर उपचारासाठी औषधे उपलब्ध होती. पण कोरोनासाठी नाहीत. त्यामुळे यात धोकाही मोठा आहे.
7 / 10
याच कारणाने एखाद्या निरोगी व्यक्तीला संक्रमित केल्यानंतर ती व्यक्ती गंभीर रूपाने आजारी पडेल तर त्याला वेळीट ठिक करणंही अवघड होईल.
8 / 10
सामान्यपणे आधीच संक्रमित झालेल्या लोकांवर वॅक्सीनचं ट्रायल केली जाते. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि इंपेरिअल कॉलेज लंडनकडून अशा लोकांवरच ट्रायल सुरू करण्यात आली.
9 / 10
पण ही प्रक्रिया हळू होते आणि याचा वेग वाढवण्यासाठी चॅलेंज ट्रायल विषय समोर आला आहे. दरम्यान, भारतातसहीत जगभरात कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत.
10 / 10
भारतात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 63 हजारांच्यावर गेलाय. तर 2109 लोकांना जीव गेला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना