Coronavirus : WHO says Fabric masks need 3 layers to best curb coronavirus spread
Coronavirus : WHO ने सांगितले कोरोनापासून बचावासाठी 'हा' ठरेल बेस्ट मास्क, तुम्ही कसा वापरता? By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 12:30 PM1 / 9दिवसेंदिवस जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या केसेस वाढत आहेत. भारतातही दररोज रूग्णांचा आकडा वाढत आहे. वेगवेगळ्या देशांच्या सरकारांसोबत WHO या व्हायरसला रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. WHO कडून या व्हायरसची लागण रोखण्यासाठी वेळोवेळी गाइडलाईन्स जारी केल्या जातात.2 / 9WHO कडून आता फेस मास्कबाबत काही महत्वाची माहिती जारी केली आहे. ताज्या माहितीनुसार, रिस्क फॅक्टर असलेल्या लोकांना मेडिकल मास्क आणि इतर सर्वच लोकांनी तीन लेअर असलेला फॅब्रिक मास्क वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून संक्रमण पसरवणाऱ्या ड्रॉपलेट्सपासून तुमचा बचाव व्हावा.3 / 9WHO चे डायरेक्टर जनरल डॉक्टर टेड्रोस एढानॉम यांनी याबाबत माहिती दिली. डॉक्टर म्हणाले की, रिसर्चनुसार WHO कडून हा सल्ला देण्यात येत आहे की, जगभरातील सर्वच सरकारांनी त्यांच्या देशातील लोकांना मास्क वारण्यासाठी जागरूक करावं. 4 / 9ज्या ठिकाणी ट्रान्समिशन वाढलंय आणि फिजिकल डिस्टेंट शक्य नाही, जसे की, पब्लिक ट्रान्सपोर्ट, दुकाने, गर्दी असलेली ठिकाणे इथे मास्क वापरणं फार गरजेचं आहे. 5 / 9टेड्रोस म्हणाले की, जर फॅब्रिक मास्कचा वापर केला जात असेल कमीत कमी तीन लेअर असणं गरजेचं आहे. हे तीनही लेअर वेगवेगळ्या मटेरिअलचे बनलेले असतात. ज्यात चेहऱ्याजवळची लेअर कॉटनची, दुसरी लेअर पॉलीप्रोपाइलीन आणि तिसरी लेअर सिंथेटीकची असते.6 / 9WHO नुसार, होममेड फॅब्रिक मास्क व्हायरसपासून 70 टक्के सुरक्षा प्रदान करतो. हा मास्क आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांसाठी अजिबात चांगला नाही. महत्वाची बाब म्हणजे हा मास्क तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकता.7 / 9फॅब्रिक मास्क वापरण्याची एक पद्धतही आहे. WHO च्या व्हिडीओत सांगण्यात आले आहे की, जर तुम्ही फॅब्रिक मास्क वापरत असाल तर तो वापरण्याची योग्य पद्घत तुम्हाला माहीत असली पाहिजे. 8 / 9सर्जिकल मास्क किंवा फॅब्रिक मास्क हा त्या सर्वच लोकांनी वापरावा जे कोविड 19 संक्रमण झोनमध्ये आहेत. तसेच जिथे पब्लिक प्लेसवर फिजिकल डिस्टेंसिंग 1 मीटरपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.9 / 9WHO कडून सांगण्यात आले आहे की, मास्क लावण्याआधी हात सॅनिटायजरने किंवा साबणाने स्वच्छ धुवावे. मास्कच्या मधल्या भागाला हात लावू नका. हा मास्क थेट नाकावर लावायचाय आणि काळजी घ्या की, चेहरा आणि मास्कमध्ये जराही गॅप राहू नये. मास्कला जितक्यांदा हात लावाल तेवढ्या वेळा हात सॅनिटाइज करा किंवा धुवावे. तसेच मास्क काढल्यावरही हात धुवावे. आणखी वाचा Subscribe to Notifications