शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus : वटवाघुळातून कोरोना व्हायरस आला असेल तर ते 'या' व्हायरसने मरत का नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 10:08 AM

1 / 16
जर कोरोना व्हायरस हा वटवाघुळातून मनुष्यात आला असेल आणि या व्हायरसने मनुष्य इतक्या मोठ्या संख्येने संक्रमित होत आहेत, तसेच हजारो मृत्यूमुखी पडत आहेत. पण मग अनेकांना असा प्रश्न पडू शकतो की, कोरोना व्हायरसमुळे वटवाघुळ का मरत नाही? चला जाणून घेऊ याच उत्तर...
2 / 16
कोणत्याही व्हायरसला प्राण्यातून मनुष्यात जंप करण्यासाठी आणि स्वत:ला अधिकाधिक वाढवण्यासाठी एका खास होस्टची गरज असते. कोणत्याही व्हायरसला वाढण्यासाठी आणि पसरण्यासाठी जी खासियत हवी असते, त्यातील जास्तीत जास्त वटवाघुळात आढळून येते. हेच कारण आहे की, अनेक व्हायरस वटवाघुळात वाढतात आणि म्यूटेशन करत राहतात....
3 / 16
वटवाघुळात का वाढतात व्हायरस? - कोणत्याही प्राण्यात काही खास गोष्टी असतात, ज्या कोणत्याही व्हायरसचा इंटरमीडिएट होस्ट बनण्यासाठी गरजेच्या असतात. जसे की वटवाघुळात असतात. ज्यात कोरोना व्हायरस राहतो असा दावा केला जातो आणि हा व्हायरस स्वत:त बदल करून स्वत:ला अधिक घातक बनवू शकतो.
4 / 16
- कोणतेही व्हायरस हे प्राण्यांमध्ये ज्या खास गोष्टी शोधतात, त्यात त्या प्राण्याचं आयुष्य अधिक असावं हेही बघतात. या गोष्टीमुळे वटवाघुळ हा प्राणी अनेक व्हायरसचा होस्ट बनतो. कारण एका वटवाघुळाचं सरासरी आयुष्य 16 ते 40 वर्षे दरम्यान असतं.
5 / 16
- सोबतच व्हायरसला असे प्राणी हवे असतात जे फार मोठ्या संख्येने एकत्र राहतात. जेणेकरून ते स्वत:ला अधिक जास्त पसरवू शकतात. ही खासियतही वटवाघुळांमध्ये असते. व्हायरससाठी गरजेचं आहे की, त्या प्राण्यांचं सोशल इंटरेक्टही अधिक असावं. लोक वटवाघुळ खातात.
6 / 16
- व्हायरसच्या ग्रोथसाठी गरजेचं आहे की, त्या प्राण्यात लढण्याची चांगली क्षमता असावी, जेणेकरून ते एका वेळी जास्त अंतर पार करू शकतील. आणि व्हायरस दूरदूरपर्यंत पसरवण्यास मदत मिळेल.
7 / 16
ट्रान्समिशनमध्ये मदत कशी होते? - कोरोना व्हायरस हा एक सिंगल स्ट्रॅडेड RNA व्हायरस आहे. त्यामुळे यात म्यूटेशन फार जास्त होतं. हेच कारण आहे की, कोरोना व्हायरस नवीन होस्टमध्ये लवकर अडप्ट होतात.
8 / 16
- उदाहरणार्थ मेर्स या व्हायरसने उंटाला आपलं होस्ट केलं, तेव्हा व्हायरसला अडप्ट केलं आणि त्यात जिवंत राहिला. पण जेव्हा त्यांनी जंप करून मनुष्यात प्रवेश केला तेव्हा ते मनुष्याला होस्ट म्हणून अडप्ट करू शकले नाही आणि नष्ट झाले.
9 / 16
- कोविड-19 केसमध्ये आतापर्यंत करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये असं समोर आलं की, नॉर्मल कोरोना व्हायरसच्या तुलनेत सार्स कोरोना-2 मध्ये म्यूटेशन कमी आढळून आलं. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, हा व्हायरस मनुष्यांमध्ये अडप्ट झाला आहे. म्हणजे त्याने मनुष्याला होस्टच्या रूपात स्वीकारलं आहे.
10 / 16
- जर हा रिसर्च खरा ठरला तर ही आपल्या वैज्ञानिकांसाठी चांगली बातमी असू शकते. कारण मग वैज्ञानिक त्यानुसार यावर औषध आणि उपचार शोधतील.
11 / 16
व्हायरस आपला होस्ट कसा निवडतो? - जेव्हा एक नवीन होस्ट शोधण्यासाठी व्हायरस एखाद्या व्यक्तीत किंवा जीवात जंप करतो, तेव्हा ही बाब महत्वाची ठरते की, त्या होस्टच्या बॉडी सेलवर तयार झालेल्या रिसेप्टर्ससोबत या व्हायरसच्या पृष्ठभागावर असलेलं प्रोटीन कशाप्रकारे बाइंड होतं. ही बाइंडिंग चांगली झाली तर समजा व्हायरस त्या जीवाला आपला होस्ट बनवतं.
12 / 16
कोरोनाने वटवाघुळ का मरत नाही? - जेव्हा कोरोना व्हायरस एखाद्या प्राण्यात संक्रमण पसरवतो तेव्हा त्यात वेगाने इंफ्लेमेशन(सूज) वाढते. पण वटवाघुळात इंफ्लेमेशन कमजोर असतं. या कारणाने वटवाघुळाच्या इंफ्लेमेटरी रिस्पॉन्समध्ये डिफेक्ट असतो.
13 / 16
वटवाघुळात नैसर्गिक किलर सेल्सची अॅक्टिविटी फार कमी असते. त्यामुळे वटवाघुळात हे व्हायरसचं इन्फेक्शन कॅरी करणाऱ्या किंवा वाहून नेणाऱ्या सेल्स मरत नाहीत. तसेच वटवाघुळाचं मेटाबॉलिक रेट फार जास्त असतं. या कारणाने देखील त्याच्यात अधिक प्रमाणात रिअॅक्टिव ऑक्सिजन स्पीशीज तयार होतात. ज्या कोरोना व्हायरसला रेप्लिकेट(प्रतिरूप) करण्यापासून रोखतात, सोबतच याचा म्यूटेशन रेटही वाढतो.
14 / 16
वटवाघुळात वाढलेल्या म्यूटेशनमुळे कोरोनाला दुसऱ्या होस्टमध्ये जंप करण्यास सोपं होतं. इतकेच नाही तर सतत होणारं हे म्यूटेशन((परिवर्तन) कोरोनाला अधिक घातक बनवतं.
15 / 16
वटवाघुळात का राहतो कोरोना? - रिसर्चनुसार, वटवाघुळात स्ट्रॉंग इम्यून रिस्पॉन्स नसतो. त्यामुळे वटवाघुळात सीविअर लंग डॅमेजचा धोका कमी राहतो. कारण त्याच्या फुप्फुसात आणि शरीरात त्यांना श्वास घेता येणार नाही, एवढी सूज नसते. वटवाघुळात इंटरफोरॉन रेस्पॉन्स फार मजबूत असतो. याकारणाने कोरोना व्हायरस वटवाघुळात वेगाने आपले प्रतिरूप तयार करू शकत नाही. इंटरफोरॉन हे ते केमिकल असतं जे शरीरात कोणत्याही व्हायरसचं रेप्लिकेशन रोखतं. म्हणून यात अजिबात आश्चर्य वाटू नये की, गेल्या 20 वर्षात वटवाघुळातून तीन प्रकारचे कोरोना व्हायरस मनुष्यांपर्यंत आले.
16 / 16
नोट : या लेखातील माहिती ही इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायॉलॉजिकल सायंन्सेजमध्ये 2020 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्च पेपरमधून घेण्यात आली आहे.