शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: कोरोनाच्या फैलावाची सुरुवात झालेल्या चीनमधील वुहानमधून पुन्हा समोर आली चिंता वाढवणारी माहिती

By बाळकृष्ण परब | Published: October 28, 2020 7:18 AM

1 / 6
कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असल्याने तसेच काही देशांमध्ये संसर्गाची दुसरी लाट आल्याने जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
2 / 6
दरम्यान, चीनमधील ज्या शहरातून कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाली होती तिथून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. वुहामधील चार टक्क्यांहून कमी रहिवाशांमध्ये कोरोना विषाणूविरोधातील अँटीबॉडी विकसित झाल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे वुहान कोरोनाविरोधातील इम्युनिटी प्राप्त करू शकले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
3 / 6
वुहानमध्ये गतवर्षी डिसेंबर महिन्यात कोरोनाचे सुरुवातीचे रुग्ण सापडले होते. त्यामुळे वुहानला कोरोनाचे केंद्र मानले जात आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गाच्या अनेक प्रकरणांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसत नसल्याने वुहानमध्ये अधिकृत आकडेवारीपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे मानण्यात येत आहे.
4 / 6
मात्र जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार वुहानमधील बहुतांश लोकांमध्ये कोरोनाविरोधातील इम्युनिटी दिसून आलेली नाही. तसेच जर या लोकांमध्ये इम्युनिटी विकसित झाली असेल तर ती फार कमी होती. या संशोधनानंतर कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी प्राप्त करण्याची अपेक्षा पुन्हा एकदा धुसर होताना दिसत आहे.
5 / 6
चीनमधील तोंगजी हॉस्पिटलशी संबंधित संशोधकाने २७ मार्च ते २६ मे या कालावधीत वुहानमधील आधी कोरोनाचा संसर्ग न झालेल्या ३५ हजारांहून अधिक व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडीची तपासणी केली. यामधील कुणामध्येही केवळ IgM अँटीबॉडी मिळाली नाही. IgM अँडीबॉडी ही संसर्गानंतर त्वरित शरीरामध्ये विकसित होते. तर नंतर तयार होणारी IgG अँटीबॉडी दीर्घकाळापर्यंत शरीरात राहते. सुमारे ३.९ लोकांमध्ये अशा प्रकारची अँटीबॉडी दिसून आली.
6 / 6
वुहान ही चीनच्या हुबेई राज्याची राजधानी आहे. हुबेईमध्ये ६८ हजारांहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित झाले होते. येथील परिस्थिती एवढी बिघडली होती की इथे तातडीने दोन रुग्णालये उभारावी लागली होती. मात्र अत्यंत कठोर लॉकडाऊननंतर चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले होते. मे महिन्यात चीनने वुहानमधील प्रत्येक रहिवाशाची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पाच वर्षांहून अधिक वय असलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली होती.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यchinaचीन