शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: हो, चीनमधील प्रयोगशाळेतच तयार झाला कोरोना विषाणू, शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच दाखवले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 2:00 PM

1 / 8
कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या संपूर्ण जग चिंतीत आहे. भारतासारख्या देशामध्ये तर कोरोना विषाणूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला रोखण्याचे आव्हान निर्माण झालेले आहे. त्यातच आता कोरोना विषाणूबाबत मोठा धक्कादायक गौप्यस्फोट शास्त्रज्ञांनी केला आहे.
2 / 8
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत पळून आलेल्या एका चिनी शास्त्रज्ञाने कोरोना विषाणू हा चीनमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचा दावा केली होता. त्यानंतर आता या दाव्याला दुजोरा देणारे पुरावे त्या शास्त्रज्ञाने अन्य तीन शास्त्रज्ञांसह जगासमोर आणले आहे.
3 / 8
डॉक्टर ली मेंग यान नावाच्या महिला शास्त्रज्ञाने आपल्याकडे कोरोना विषाणू प्रयोगशाळेत विकसित करण्यात आल्याचे पुरावे असल्याचा दावा केला होता. मात्र ही महिला शास्त्रज्ञ करत असलेले दावे चीन सरकारने सातत्याने फेटाळून लावलेले आहेत.
4 / 8
हाँगकाँग विद्यापीठात काम करत असताना ली मेंग यान हिचा कोरोनावर संशोधन करणाऱ्या सुरुवातीच्या संशोधकांमध्ये सहभाग होता. त्यांनी ओपन अॅक्सेस रिपोजिटरी वेबसाइट Zenodo वर विषाणूशी संबंधित पुरावे प्रकाशित केले आहेत. त्यांनी तीन अन्य संशोधकांसह मिळून यावर काम केले आहे.
5 / 8
ली मेंग यांनी याआधी सांगितले होते की, कोरोना विषाणू हा प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे. हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही. कोरोना विषाणूच्या जिनोममधील असामान्या रचनेमुळे ही बाब स्पष्ट होते की हा विषाणू नैसर्गिकरीत्या मानवामध्ये आला नसून तो प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आला आहे.
6 / 8
कोरोना विषाणू हा नैसर्गिकरीत्या पसरला असल्याचा सिद्धांत लोकांना मान्य केला आहे. मात्र या सिद्धांताला भक्कम असे पुरावे नाही आहेत. तर चीनमधील प्रयोगशाळेतून हा विषाणू पसरला असल्याचे दुसरा सिद्धांत सांगतो. कोरोना विषाणूचे जीवशास्त्रीय गुणधर्म हे नैसर्गिकरीत्या सापडणाऱ्या विषाणूप्रमाणे नाही आहेत.
7 / 8
ली मेंग यान यांनी आपला दावा अधिक भक्कम करण्यासाठी जिनोमिक स्ट्रक्चरल, मेडिकल, लिटरेचरवर आधारित पुरावे सादर केले आहेत. या सर्व बाबींचा एकत्रित विचार केल्यास कोरोना विषाणू हा नैसर्गिकरीत्या माणसांमध्ये आला हा दावा खोटा ठरतो.
8 / 8
पुरावे सांगतात की, बॅट कोरोना विषाणू ZC45 किंवा ZXC21 च्या टेम्प्लेटवर हा विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे. सुमारे सहा महिन्यांमध्ये प्रयोगशाळेत असा विषाणू तयार करता येऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रयोगशाळेची स्वतंत्रपणे तपासणी केली पाहिजे, अशी मागणी यान यांनी केली.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य