Coronavirus:Corona virus could be control by next year says who officials
Coronavirus: "...तर २०२२ पर्यंत कोरोना नियंत्रणात येईल, पण या चुकीनं टेन्शन वाढेल"; WHO नं सांगितलं By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 6:49 PM1 / 10कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटना (WHO)नं सोमवारी सांगितले की, जर वास्तवमध्ये भाग्यवान राहिलो तर पुढील वर्षापर्यंत कोरोना संकट आपल्यावरून निघून जाईल. जर जागतिक स्तरावरील नेत्यांनी ठरवलं तर कोरोना महामारीवर ताबा मिळवू शकतो असं WHO च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 2 / 10WHO चे हेल्थ इमरजेंसी प्रोग्रामचे एग्जिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉक्टर माइक रियान म्हणाले की, मला हे सांगताना आनंद होईल की यावर्षी महामारीचा अंत होईल परंतु वास्तवमध्ये असं काही होणार नाही. आपण खूपच भाग्यवान असलो तर २०२२ पर्यंत कोरोना महामारीवर नियंत्रण आणता येईल. 3 / 10डॉ. रियान यांनी सांगितले की, जर आपण गरीब देशांमध्ये कोरोना लस उपलब्ध करून दिल्या, सोशल डिस्टेंसिंगचं पालन आणि हॉस्पिटलमध्ये मदत पोहचवली तर महामारीचं संकट टळू शकतं. लसीकरणाचा उच्च दर महामारीच्या संकटापासून आपल्याला मुक्त करू शकतो.4 / 10वाढू शकतात अडचणी – डॉ. रियान यांनी जगभरातील नेत्यांवर टीका करताना म्हटलं की, कोरोना लसीचा स्टॉक गरीब देशांसोबत वाटला जात नाही. लहान मुलांनीही देशाला विचारलं पाहिजे की त्यांच्याकडील लसीचा साठा इतरांना का देत नाही. आपण गरीब देशांना लसीचा पुरवठा करत नाही त्यामुळे आपण निष्पक्ष नाही. 5 / 10या विषयावर वैन करखोवे म्हणाले की, जगभरातील देशांमध्ये आताही कोविड १९ च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या एक आठवड्यात जागतिक स्तरावर ११.५ टक्क्यांनी रुग्णांची वाढ होत आहे तर मृतांचा दरही १ टक्के जास्त आहे. 6 / 10मागील आठवड्यात WHO नं सहापैकी ४ क्षेत्रात मृतांचा आकडा वाढत असल्याचं म्हटलं होतं. पश्चिमी प्रशांतमध्ये पहिल्या तुलनेत १० टक्क्यांनी जास्त मृत्यू झाले आहेत. साऊथ ईस्ट एशियात मृत्यूदर १२ टक्क्यांनी वाढला आहे. पूर्व भूमध्यसागर येथे ४ टक्के मृत्यूदर आहे तर आफ्रिकी महाद्विप आजही घातक संकम्रणाने पीडित आहे.7 / 10WHO च्या अधिकाऱ्यांनुसार, ज्याठिकाणी कोरोना इंफेक्शन व्हॅक्सिन प्रोटेक्शन तोडण्यात यशस्वी होत आहे त्याठिकाणी माइल्ड केस मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. दुसरीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संक्रमणात वेगाने वाढ होण्याचीही शक्यता आहे.8 / 10वैन करखोवे म्हणाले की, डेल्टा स्ट्रेन अखेर व्हेरिएंट ऑफ कन्सर्न नसणार, ज्यापद्धतीने तुम्ही पाहत असाल डेल्टानंतर कोरोनात अनेक नवे व्हेरिएंटसमोर आले आहेत. ज्यामुळे आपल्यासमोरील अडचणी आणि चिंता वाढल्या आहेत. 9 / 10तज्त्रांनी सांगितले की, संपूर्ण जगातील लोक जितकं लसीकरणापासून पळ काढतील, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणार नाही. धोकादायक व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता तितकीच जास्त आहे. WHO ने हेदेखील सांगितले की, आवश्यकता असेल तरच आंतरराष्ट्रीय प्रवास करायला हवा10 / 10तसेच कोरोना महामारीच्या काळात तुम्ही जे काही कराल त्याने धोका आणखी वाढेल अथवा कमी करेल. याठिकाणी झीरो रिस्कसारखं काहीच नाही. आपल्याला महामारीत जोखीम कमी करण्याबाबत विचार केला पाहिजे असंही डॉ. रियान म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications