CoronaVirusVaccine: रशियाला पुन्हा एकदा मोठं यश, दुसऱ्या कोरोना लशीचंही परीक्षण पूर्ण! By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 30, 2020 5:47 PM1 / 10जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातच, रशियातून आणखी एक मोठी बातमी आली आहे. कोरोना व्हायरस लशीसंदर्भात रशियाला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. रशियातील वृत्तसंस्था RIAने दिलेल्या माहितीनुसार, रशियात दुसऱ्या कोरोना लशीचे मानवी परीक्षण पूर्ण झाले आहे.2 / 10जगातील पहिली कोरोना लस तयार केल्यानंतर, रशिया आता पुढच्या महिन्यात जगाला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का देण्याच्या तयारीत आहे.3 / 10रशियन वृत्तसंस्था RIAने आज रशियन ग्राहक सुरक्षा (Russian Consumer Safety) 'Rospotrebnadzor'च्या हवाल्याने सांगितले, 'रशियाच्या सायबेरिया व्हेक्टर इंस्टिट्यूटने (Siberia Vector Institute) विकसित केलेल्या दुसऱ्या कोरोना व्हायरस लशीचे मानवी परीक्षण पूर्ण केले आहे. 4 / 10सायबेरिया व्हेक्टर इंस्टिट्यूटने (Siberia Vector Institute) याच महिन्याच्या सुरुवातीला, या कोरोना लशीचे सुरुवातीच्या टप्प्यावरील अथवा दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षण पूर्ण झाल्याची माहिती दिली होती.5 / 10रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे, कोरोनाविरोधात प्रभावी ठरलेली दुसऱ्या लशीचीही लवकरच नोंदणी केली जाईल. 6 / 10रशियातून दुसऱ्या कोरोना लशीसंदर्भात पुढील ऑक्टोबर महिन्यात मोठी बातमी येऊ शकते. रशियाने दुसऱ्या कोरोना लशीचे रजिस्ट्रेशन करण्याची तयारी पूर्ण केली आहे. 7 / 1015 ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या कोरोना लशीची नोंदणी होईल, अशी आशा रशियाने व्यक्त केली आहे. सायबेरिया व्हेक्टरने गेल्या आठवड्यातच लशीच्या सुरुवातीच्या टप्प्यावरील मानवी परीक्षण पूर्ण केले आहे. 8 / 10यापूर्वी रशियाने 11 ऑगस्ट, 2020 रोजी आपल्या पहिल्या कोरोना लशीची नोंदनी केली होती. कोरना लस रजिस्टर करणारा रशिया हा पहिलाच देश आहे. 9 / 10रशियामध्ये सध्या स्पुतनिक-V(Sputnik V) कोरोना लस सामान्य नागरिकांना देण्यात येत आहे. रशियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की महामारीच्या या संकट काळात कोरोनाचा खात्मा करण्यात ही लस प्रभावी ठरेल.10 / 10स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, कोरोना लशीचा पहिला लॉट राजधानी मॉस्कोमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications