Coronvirus : Covid 19 can infect you in ten minutes new study research claims api
Coronavirus : नव्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, केवळ 10 मिनिटात तुम्ही होऊ शकता कोरोना व्हायरसचे शिकार! By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 1:01 PM1 / 10कोरोना व्हायरस आल्यापासून वेगवेगळे रिसर्च समोर येत आहेत. लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. अशात आता नव्याने समोर आलेला रिसर्च वाचून तुम्हाला हे कळेल की, कोरोना व्हायरसच्या थैमानात घरात राहणं सर्वात सुरक्षित का आहे. 2 / 10तुमच्या शरीरातून निघणारे द्रव्याचे थेंब, जसे की शिंकताना आणि खोकतांना किंवा बोलतानाही तोंडातून काही थेंब बाहेर पडतात. श्वास घेताना देखील फार छोटे छोटे थेंब हवेत पसरतात. त्यामुळे निरोगी व्यक्तीही कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकू शकतो.3 / 10एका नव्या रिसर्चमध्ये समोर आले आहे की खोकला आणि शिंकण्यासहीत इतर गोष्टींमुळे शरीरातून निघणारे थेंब तुम्हाला दहा मिनिटात कोरोनाने संक्रमित करू शकतात.4 / 10मॅसाच्युसेट्स युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक एरिन ब्रोमेज यांनी एक नवा फॉर्म्यूला तयार केला आहे. त्यानुसार कोरोना व्हायरसचं संक्रमण तुम्हाला किती संक्रमित करतो, हे तुम्ही व्हायरसने संक्रमित ठिकाणावर किती वेळ घालवला यावर अवलंबून असेल.5 / 10एरिन ब्रोमेज यांनी सांगितले की, मी सामान्य बोलणं आणि सामान्य परिस्थितीत श्वास घेताना होणाऱ्या संक्रमणावर रिसर्च केला. जर एक निरोगी व्यक्ती एखाद्या कोरोनाने संक्रमित व्यक्तीसोबत सोशल डिस्टेंसिंग मेंटेन ठेवत नसेल तर संक्रमण 10 मिनिटात होऊ शकतं. 6 / 10सामान्यपणे श्वास घेताना एक व्यक्ती 50 ते 50 हजार थेंब आपल्या नाकातून आणि तोंडातून बाहेर सोडतो. हे थेंब हवेत मिसळतात. ज्यावर आपलं लक्ष कधीच जात नाही. पण तुम्ही हे बघू शकता. हे थेंब तुम्हाला तुमच्या चष्म्याच्या ग्लासवर हलक्या वाफेच्या रूपात जमा झालेले दिसतील.7 / 10सामान्य वातावरणात ग्रॅव्हिटीमुळे जास्तीत जास्त थेंब जमिनीवर पडतात. पण काही थेंब हवेत तरंगत असतात. कारण त्यांचं वजन कमी असतं.8 / 10एरिन यांनी सांगितले की, असं मानून चला की जर एखादी व्यक्ती सामान्यपणे श्वास घेताना प्रति मिनिट 20 थेंब बाहेर काढत असेल कोरोनाच्या केसमध्ये ती व्यक्ती 1 हजार थेंब काढेल. जर तिथे एखादी निरोगी व्यक्ती असेल तर पुढील 10 मिनिटात ती व्यक्ती कोरोनाच्या जाळ्यात येईल.9 / 10त्यांनी सांगितले की, बोलताना श्वास घेण्याच्या तुलनेत 10 टक्के जास्त थेंब निघतात. म्हणजे 200 थेंब प्रति मिनिटे. म्हणजे कोरोना संक्रमित व्यक्ती बोलताना 10 हजार व्हायरस असलेले थेंब हवेत पास करेल. याने संक्रमणाचा धोका अधिक वाढतो.10 / 10एरिन म्हणाले की, आम्ही एका रिसर्चमध्ये वाचलं होतं की, कोरोना व्हायरस 14 मिनिटांपर्यंत हवेत तरंगतो. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या संक्रमित व्यक्तीसमोर बसून 10 मिनिटे संवाद केला तर त्या 10 दहा मिनिटांमध्ये तुम्ही संक्रमित व्हाल. आणखी वाचा Subscribe to Notifications