शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! कोविड-१९ च्या ८५ टक्के रूग्णांना त्रास देत आहेत मेंदूसंबंधी हे चार आजार - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 10:15 AM

1 / 9
कोरोनाने पीडित ८५ टक्के लोकांना चार प्रकारच्या मेंदूच्या समस्या सतत बघायला मिळत आहेत. या न्यूरोरॉजिकल समस्या बरेच दिवस कोरोना पीडित व्यक्तीला त्रास देऊ शकतात. यात मेंदूत धुकं निर्माण होणं, डोकेदुखी, गंध आणि चव जाणे यांचा समावेश आहे. हे त्यांच्यासोबतही होऊ शकतं जे कोरोनाने पीडित झाले पण हॉस्पिटलमध्ये भरती झाले नाही. किंवा गंभीरपणे आजारी पडले नाहीत. हा खुलासा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.
2 / 9
Annals of Clinical and Translational Neurology जर्नलमध्ये २३ मार्चला प्रकाशित या रिसर्चमध्ये अमेरिकेतील २१ राज्यातील १०० कोविड-१९ रूग्णांवर अभ्यास करण्यात आला. रूग्णांशी बोलून, त्यांच्या टेस्ट करून त्यांचा एक रिपोर्ट तयार करण्यात आला.
3 / 9
यातील एकही रूग्ण असा नव्हता ज्याला कोरोना संक्रमित झाल्यावर हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं असेल. या रूग्णांना सहा आठवड्यांपर्यंत या चारही मेंदूसंबंधी समस्यांचा सामना करावा लागला. बरे झाल्यानंतर चार किंवा पाच महिन्यांनंतरही यांना या समस्यां होत्या.
4 / 9
१०० कोरोना रूग्णांपैकी अर्धे कोरोना पॉझिटिव्ह होते. तर अर्धे कोरोना निगेटिव्ह होते. पण त्यांच्यात कोविड-१९ चे लपलेले लक्षण होते. यात मेंदूसंबंधी आजारांचाही समावेश आहे. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात त्या रूग्णांची टेस्ट करणं अवघड होतं, जे हॉस्पिटलमध्ये नव्हते.
5 / 9
८५ टक्के कोरोना रूग्णांना मेंदूसंबंधी चार समस्या आल्या. ८१ टक्के रूग्णांच्या मेंदूत धुकं(Brain Fog) तयार होत होता. म्हणज त्यांना विचार करण्यात आणि समजण्यात अडचण येत होती. इतकेच नाही तर त्यांना वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी फार वेळ लागत होता. त्यासोबतच ६८ टक्के लोकांनी त्यांना सतत थोड्या थोड्या वेळाने डोकेदुखीची तक्रार केली होती.
6 / 9
६० टक्के लोकांनी शरीराचे अवयव सुन्न होणे किंवा गुदगुल्या झाल्याचा उल्लेख केला. ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी चव आणि गंध घेण्याची क्षमता कमी झाल्याची तक्रार केली. ४७ टक्के लोकांनी आळस आणि थकवा असल्याचे सांगितले. ३० टक्के लोकांनी धुसर दिसत असल्याचं सांगितलं. इतकेच नाही तर २९ टक्के लोकांनी कानात घंटीचा आवाज येत असल्याची तक्रार केली.
7 / 9
त्यासोबतच जे आजार आणि लक्षणे लोकांमध्ये बघितले गेले त्यात थकवा, डिप्रेशन, अवस्थता, झोप न येणे आणि गॅस्ट्रोइंटेसटाइनल यांचा समावेश आहे. पण जी चार लक्षणे सर्वात जास्त पााहिली गेली त्यात मेंदूत धुकं, डोकेदुखी, सुन्न होणे किंवा थरथरणे आणि चव-गंध घेण्याची क्षमता जाणे यांचा समावेश आहे.
8 / 9
नॉर्थवेस्टर्न मेडिसिनमध्ये न्यूरो-इन्फेक्शन डिजीज अॅन्ड ग्लोबल न्यूरोलॉजीचे प्रमुख आणि या रिसर्चचे लेखक डॉ. इगोर कोरलनिक म्हणाले की, ३० टक्के कोरोना रूग्णांमध्ये या चार समस्या ९ ते १० महिने राहतात. त्यामुळे त्यांचं सामान्य जीवन खराब झालं आहे. कोरोना होण्याआधी आणि त्यानंतर रूग्णांसाठी सर्वात मोठी अडचण आहे त्यांनी मानसिक रूपाने निरोगी राहणे. पण लोक डिप्रेशन आणि ऑटोइम्यून डिजीजचे शिकार होत आहे.
9 / 9
ज्या रूग्णांवर अभ्यास करण्यात आला त्यात ७० टक्के महिला होत्या. महिलांमध्ये ऑटोइम्यून डिजीज जास्त बघितले गेले. जसे की, रह्यूमेटॉयज आर्थरायटिस. हा आजार कोरोना पीडित पुरूषांच्या तुलनेत कोरोना पीडित महिलांमध्ये तीन पटीने अधिक होत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन