शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Covid 19 New Symptom : बापरे! सर्दी-ताप नाही तर 'ही' आहेत कोरोनाची 6 सायलेंट लक्षणं; वेळीच सावध न झाल्यास ठरतील जीवघेणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 5:02 PM

1 / 16
जगभरात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक देशांमध्ये चौथ्या लाटेचा कहर पाहायला मिळत असून भारतातही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 16
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15,940 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 524974 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
3 / 16
कोरोनाच्या बदलत्या प्रकारांमुळे त्याच्या लक्षणांमध्येही झपाट्याने बदल होत आहेत. आता फक्त सर्दी, खोकला किंवा ताप हीच कोरोनाची लक्षणे राहिलेली नाहीत. कोरोना व्हायरस हा शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करत आहे.
4 / 16
कोरोना रुग्णांमध्ये आता विचित्र लक्षणेही दिसून येत आहेत. चिंतेची बाब आहे की, कोरोनाची लक्षणे रुग्णांना काही दिवस किंवा आठवडेच नव्हे तर अनेक महिने आणि वर्षांनंतरही त्रास देऊ शकतात.
5 / 16
कोरोनाच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, धाप लागणे, नाक वाहणे, वास घेण्याची क्षमता कमी होणे आणि पोटाच्या समस्या यांचा समावेश होतो. पण काही सायलेंट लक्षणे देखील आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे.
6 / 16
सायलेंट लक्षणे ही सामान्य आजारांसारखीच असल्यामुळे ती वेळेत ओळखणे आणि उपचार करणे शक्य नाही. पण वेळीच सावध न झाल्यास ती अधिक घातक किंवा जीवघेणी ठरू शकतात. त्या सायलेंट लक्षणांबद्दल जाणून घेऊया...
7 / 16
कोरोना व्हायरसचा शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम करत आहे. बरे झाल्यानंतरही रुग्णांना अशक्तपणाची लक्षणे जाणवत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे चक्कर येणे हे कोरोनाचे गंभीर लक्षण असू शकते.
8 / 16
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये कोरोना रुग्ण जेव्हा चालायला उभे राहतात तेव्हा तोल जाऊन पडू शकतात आणि त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.
9 / 16
कॅसर हेल्थच्या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे लोकांमध्ये उदासीनता, अस्वस्थतता किंवा चिंता यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात. ही लक्षणे अशा लोकांमध्ये जास्त दिसून येतात ज्यांना इतर आवश्यक गरजांसाठी कुटुंबातील सदस्यांकडून फारशी मदत मिळत नाही किंवा जे जवळच्या लोकांपासून दूर राहतात.
10 / 16
कोरोना व्हायरसचा मेंदूवर विशेषत: वृद्ध लोकांच्या मेंदूवर जास्त गंभीर परिणाम होताना दिसत आहे. कोरोनाग्रस्त लोकांमध्ये विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता हरवणं यासारख्या समस्या किंवा मेंदूशी संबंधित इतर समस्या दिसू शकतात.
11 / 16
जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर हे लक्षण तुम्हाला बराच काळ त्रास देऊ शकतं. एखाद्या चांगल्या डॉक्टरांना भेटून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणं हाच यावरचा उत्तम मार्ग आहे.
12 / 16
भूक न लागणे हे अनेक आरोग्याच्या समस्यांचे लक्षण आहे, पण हे लक्षण रुग्णांमध्ये जेव्हा कोरोना होतो तेव्हा दिसून येते. खरं तर, कोरोना व्हायरस रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो, ज्यामुळे रुग्णांना भूक लागत नाही.
13 / 16
हेल्थ एक्सपर्ट्स हेल्दी आहार घेण्याचा आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी इतर मार्ग वापरण्याचा सल्ला देत आहेत. कोरोना काळात योग्य आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. शरीरासाठी ते फायदेशीर ठरतं.
14 / 16
जर तुमच्या कुटुंबातील कोणी नेहमीपेक्षा जास्त झोपत असेल तर ते कोरोनाचे असामान्य लक्षण असू शकतं. यासह स्वित्झर्लंडमधील लॉजेन हॉस्पिटलने कोरोनाच्या रुग्णांमधील या लक्षणांवर संशोधन केले. त्यात असे आढळून आले की कोरोनाग्रस्त लोक खूप थकलेले आणि सुस्त असतात.
15 / 16
कॅसर हेल्थच्या रिपोर्टमध्ये असे नमूद केले आहे की कोरोनाने ग्रस्त असलेल्या लोकांना मेंदूच्या अनेक समस्या असू शकतात ज्यामध्ये गोंधळ किंवा विचलित होणे समाविष्ट आहे. विशेषत: हे लक्षण वृद्धांमध्ये अधिक दिसून येते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
16 / 16
(टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स