शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

COVID-19: गायीचं दूध प्यायल्यानं कोरोनापासून संरक्षण?; अमेरिकन संशोधकांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 2:44 PM

1 / 10
मागील २ वर्ष कोरोना महामारीनं अवघ्या जगासमोर मोठं संकट उभं केले. कोरोनामुळे लाखो लोकं दगावली. भलेही आता कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी आजही कोरोना व्हायरसचा प्रकोप अद्याप पूर्णपणे संपुष्टात आला नाही.
2 / 10
कोरोनाच्या विविध व्हेरिएंटनं हाहाकार माजवला. सर्वात घातक ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत राहिली. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट येत पुन्हा लोकांच्या मनात दहशत निर्माण होत होती.
3 / 10
कोरोनाची लाट कधीही धडकू शकते असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. कोरोनावर अजूनही लसीकरणाशिवाय काहीच ठोस उपाय नाही. लसीकरण हाच एकमेव सुरक्षेचा पर्याय आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहिम देशव्यापी राबवण्यात आली.
4 / 10
आता वैज्ञानिकांना असा पुरावा सापडला आहे की, गायीचं दूध प्यायलाने कोविड इन्फेक्शन संपवण्यासाठी मदत मिळू शकते. हा रिपोर्ट जर्नल ऑफ डेयरी सायन्समध्ये उपलब्ध केला आहे. यूनिवर्सिटी ऑफ मिशिगन आणि ग्लेनबिया पीएलसी रिसर्च अँन्ड डेवल्पमेंटच्या संशोधकांनी हा दावा केला आहे.
5 / 10
या दाव्यात असं म्हटलं आहे की, गायीच्या दूधात असं खास प्रोटीन आढळलं आहे जे कोरोनासाठी कारणीभूत असलेले SARS Cov 2 व्हायरसला रोखू शकतं. गायीच्या दूधात ताकदवर प्रोटीन ‘लॅक्टोफेरिन’ आढळलं आहे.
6 / 10
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, लॅक्टोफेरिन हे मुख्यतः प्राण्यांच्या दुधात आढळणारे प्रोटीन आहे. गाईच्या दुधात आढळणारे हे प्रथिन अनेक सूक्ष्मजंतू, विषाणू आणि इतर रोगजनकांच्या विरोधात कार्य करते असं या अभ्यासात असे आढळून आले.
7 / 10
शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, लॅक्टोफेरिनने SARS-Co-2 संसर्गास प्रतिबंध केला आणि कोरोना व्हायरसला पेशींमध्ये प्रवेश करण्याची संक्रमित करण्याची क्षमता रोखली. गायीच्या दुधातील प्रथिने देखील पेशींची अँटीव्हायरल संरक्षण यंत्रणा वाढविण्यास मदत करतात.
8 / 10
गायीचं दूध प्यायल्याने विषाणूजन्य संसर्गाची तीव्रता कमी होते. रोटाव्हायरस आणि नोरोव्हायरससह, त्यातील लॅक्टोफेरिन अँटीव्हायरल प्रभाव आणि कमी साइड इफेक्ट पाहता शास्त्रज्ञ याकडे कोरोनाव्हायरस विरूद्ध प्रतिबंधात्मक उपचार म्हणून पाहत आहेत.
9 / 10
लेखकांनी SARS-Co-2 च्या विविध प्रकारांवर लैक्टोफेरिनची चाचणी केली, जसे की WA1 व्हेरिएंट, ज्यामुळे २०२० मध्ये यूएसमध्ये कोरोनाव्हायरसची पहिली लाट आली. लॅक्टोफेरिन भविष्यातील कोरोनाव्हायरसच्या विविध व्हेरिएंटविरोधात समान अँटी-व्हायरल फायदे प्रदान करू शकते असं संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे.
10 / 10
तर दुधात आढळणारे इतर पोषक घटक विषाणूविरोधी फायदे देत नाहीत. लॅक्टोफेरिनमध्ये अँटीव्हायरल प्रभावी आहे. त्यात कोरोनासह इतर संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्याची किंवा उपचार करण्याची शक्ती आहे. परंतु सध्याच्या काळात उपचाराचे पर्याय खूप महाग आहेत, तो एक स्वस्त आणि चांगला उपचार पर्याय सिद्ध होऊ शकतात असं शास्त्रज्ञांना विश्वास आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या