शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांमध्ये वाढला मृत्यूचा धोका? ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 10:49 AM

1 / 8
देशाने कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना केला आहे. कोरोना महामारीनंतर सरकारने लोकांचा जीव वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली. देशातील लोकांना लसीचे दोन अब्जाहून अधिक डोस देण्यात आले.
2 / 8
गेल्या एक ते दीड वर्षात देशात हार्ट अटॅकने तरुणांचा मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत यामागे ही लस कारणीभूत आहे का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) यावर उत्तर दिलं आहे.
3 / 8
ICMR ने नुकताच एक रिसर्च केला आहे. यामध्ये कोरोना लस आणि आकस्मिक मृत्यू यांचा काही संबंध आहे का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात आले आहे. अभ्यासाद्वारे, ICMR ने म्हटलं आहे की भारतात कोविड-19 लसीमुळे तरुणांमध्ये अचानक मृत्यूचा धोका वाढलेला नाही
4 / 8
कोरोना पूर्वी हॉस्पिटलायझेशन, कुटुंबातील आकस्मिक मृत्यूची जुनी प्रकरणे आणि जीवनशैलीतील बदल यामुळे अचानक मृत्यूची शक्यता वाढली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले होते.
5 / 8
ICMR अभ्यासात असे म्हटले आहे की, लसीमुळे आकस्मिक मृत्यूचा कोणताही संबंध नाही. जर एखाद्याने लसीचा किमान एक डोस घेतला असेल तर कोरोना व्हायरसमुळे मृत्यूचा धोका कमी होतो असे सांगण्यात आले आहे.
6 / 8
कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झाल्याची हिस्ट्री, अचानक मृत्यूची कौटुंबिक हिस्ट्री, मृत्यूच्या 48 तास आधी दारू पिणे, ड्रग्ज घेणे किंवा मृत्यूच्या 48 तास आधी खूप व्यायाम करणे ही काही कारणे आहेत. ज्याच्यामुळे अचानक मृत्यूचा धोका वाढतो.
7 / 8
ICMR द्वारे हा अभ्यास 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2023 या कालावधीत केला गेला. त्यात देशभरातील 47 रुग्णालयांचा समावेश होता. 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोक, जे वरवर निरोगी दिसत होते, त्यांचा अभ्यासासाठी समावेश करण्यात आला होता.
8 / 8
या लोकांपैकी कोणालाही कोणताही जुना आजार नव्हता. अभ्यासात असे दिसून आले की कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांमध्ये अचानक मृत्यूचा धोका खूपच कमी होता.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस