शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Covid-19 vaccine: कोविड लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय खायचं अन् काय नाही?; तज्ज्ञांनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 5:05 PM

1 / 14
१ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झालं आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता लस घेण्यासाठी अनेक उत्सुक आहेत. त्यामुळे लसीचा जास्तीत जास्त फायदा शरीराला मिळू शकेल यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळे लस घेण्यापूर्वी काय खावं आणि काही नाही याबाबत काळजी घेणं गरजेचे आहे.
2 / 14
जर तुम्ही दारू पित असाल तर काही दिवस दारूपासून लांब राहा. लस घेतल्यानंतर काही दिवस दारू पिऊ नका. काही लोकांमध्ये लसीचे सामान्य परिणाम आहेत तर काहींमध्ये गंभीर परिणाम दिसून येत आहेत. ताप, डोकेदुखी, थकवा, उलटी असे सामान्य परिणाम जाणवतात त्यात दारू पित असाल तर शरीरातील डिहाइड्रेशन वाढू शकतं त्यामुळे सामान्य परिणामही गंभीर होऊ शकतात.
3 / 14
दारूमुळे इम्यून सिस्टमवर दबाव येतो. अल्कहोल रिसर्च पत्रिकेत छापलेल्या एका स्टडीमध्ये तज्ज्ञांनी दारूचं जास्त मात्रा आणि इम्यून सिस्टम यांच्यात संबंध असल्याचं आढळून येत आहे. दारू पिल्याने लवकर झोप येते. त्यामुळे पूर्ण आणि चांगली झोप येत नाही त्याचा परिणाम रोगप्रतिकार शक्तींवर होतो.
4 / 14
लस घेतल्यानंतर एक दिवस पूर्ण शरीराला आराम द्या. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. लस घेण्याच्या एक दिवस आधी रात्री चांगली झोप घ्या, डिनर डायटवर लक्ष द्या. क्लिनीकल स्लीप मेडिसिन पत्रिकेनुसार फायबरची कमी मात्रा आणि सॅचुरेटेड फॅट आणि शुगर शरीराला योग्य मजबुती मिळत नाही. त्यामुळे त्याने झोपही मिळत नाही.
5 / 14
दुसरीकडे एका रिपोर्टमध्ये फायबरचं जास्त प्रमाण घेतल्याने खूप खोलवर झोप लागते. रात्री जेवण असं खा ज्याने लवकर झोप येईल आणि चांगली झोप मिळेल. लस घेण्यापूर्वी डिनरमध्ये सूप आणि सलाद खाण्याचा प्रयत्न करा.
6 / 14
जर तुम्ही डिनर लवकर केलं आणि झोपण्यापूर्वी भूक लागली तर त्या दरम्यान ताजी फळं खा. झोपण्यापूर्वी पचन झालं पाहिजे असे पदार्थ खावा. काहीही खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका. कमीत कमी ३ तासाचा गॅप ठेवा. झोपण्यापूर्वी ६ तासाआधी कॉफी पिणं बंद करा. झोपण्यापूर्वी लिक्विड डाइट करू नका ज्यामुळे तुम्ही झोपेतून उठून बाथरूमला जावं लागेल.
7 / 14
लस घेण्यापूर्वी आणि त्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय त्यावर तुम्ही हाइड्रेटेड आहे हे जाणवतं. इंस्टिट्यूट ऑफ मेडेसिननुसार महिलांनी प्रत्येक दिवशी २.७ लीटर(११ कप) आणि पुरुषांनी ३.७ लीटर(१५ कप) पाणी प्यावं. लस घेण्यापूर्वी शरीरात पाण्याची कमी अजिबात नको.
8 / 14
जर तुम्हाला तहान कमी लागत असेल तर तुम्ही अलार्मदेखील लावू शकता. त्यामुळे वेळचेवेळ पाणी पिणं गरजेचे आहे. तुम्ही प्रत्येक वेळी पाणी पिऊ शकत नसाल तर काही अंतराने लिंबू पाणी प्या. तुम्ही फळंही खाऊ शकतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमी भरून निघेल.
9 / 14
ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये वैज्ञानिकांनी सांगितलं आहे की, कोविड १९ पासून वाचण्यासाठी तुमच्या आहारावरही विशेष लक्ष द्यायला हवं. लसीचा प्रभाव आणि न्यूट्रिशन संबंधावर रिपोर्ट आहे तो अद्याप प्रसिद्ध झाला नाही. न्यूट्रिशन आणि अँन्टी इन्फ्लामेट्री पदार्थ खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. लस घेतल्यानंतर त्याचा फायदा होता.
10 / 14
लस घेतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. अनेकदा हा तणाव अंगदुखीत बदलतो. त्यासाठी लस घेण्यापूर्वी पाणी, लिक्विड डाईट आणि पोटभरून जेवा. त्यामुळे लस घेतल्यानंतर तुम्हाला कमी परिणाम जाणवेल. काही लोकांना ब्लड शुगरमुळे चक्कर येते. लस घेतल्यानंतर प्रोटिन, फायबर आणि हलके फॅटवाले पदार्थ खावा.
11 / 14
जर लस घेण्यासाठी तुमची सकाळची वेळ असेल तर ब्रेकफास्टमध्ये ओट्स, फळं आणि भाज्या आणि ऑमलेटही खाऊ शकता. जर तुमची वेळ दुपारची असेल तर हिरव्या भाज्या, डाळ आणि सलाद खाऊन लस घेण्यासाठी जा
12 / 14
जर तुम्ही लस घेण्यासाठी घाबरत असाल आणि काहीही खाण्याचं मन नाही तर दही, केळं असे आहार करा. त्यात फळांचा ज्यूस, हिरव्या भाज्याही खाऊ शकता. त्यामुळे तुमचा मूड ठीक होईल आणि त्याने तुम्हाला एनर्जीही मिळेल.
13 / 14
लस घेतल्यानंतर उलटीसारखं जाणवतं. त्यासाठी वाचण्यासाठी असे पदार्थ खा ज्याचं पचन लवकर होईल. सूप, नारळ पाणी प्या. टरबूज, ब्राऊन राईस, बटाटे खाणंही फायदेशीर आहे. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर थोड्या थोड्या वेळानंतर काहीतरी खा. लस घेतल्यानंतर मटणसारखे जड पदार्थ खाऊ नका.
14 / 14
लस घेतल्यानंतर त्याचे परिणाम काही दिवसच राहतील परंतु आहाराची निगडीत चांगल्या सवयी कायम तुम्हाला निरोगी ठेवतील. भरपूर पाणी आणि न्यूट्रिशन पदार्थ तुमच्या शरीराला फायदेशीर आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस