शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लसीकरणासाठी केवळ ३० मिनिटं बसावं लागणार; 'अशी' केली जातेय लस देण्याची व्यवस्था, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 1:15 PM

1 / 7
केंद्र सरकराने कोरोनाच्या लसीकरणासाठी नवीन गाईड लाईन्स दिल्या आहेत. लसीचे वितरण आणि एडमिनिस्ट्रेशनसाठी एसओपीमध्ये केंद्र सरकारने अनेक राज्यांना गाईड लाईन्स दिल्या आहेत. लसीकरणासाठी लोकांना सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. त्यानंतर एक तारीख दिली जाणार आहे.
2 / 7
लसीकरणासाठी लोकांना केंद्रावर पोहोचावं लागणार आहे. लसीकरणासाठी पोलिंग बूथ, कॉलेजेस, कम्यूनिटी हॉल्सचा वापर केला जाणार आहे. या व्यतिरिक्त पालिका भवन, पंचायत इमारती, रेल्वे रुग्णलय, पॅरामिलिट्री फोर्सेसचे कँम्प या ठिकाणांचा लसीकरणासाठी वापर केला जाणार आहे. 
3 / 7
जिथे लस दिली जाईल तिथे तीन खोल्या असाव्यात. पहिले प्रतीक्षालय, दुसरे लसीकरण कक्ष आणि तिसरे निरीक्षण कक्ष असेल. या ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल. लस देत असलेल्या संघात एक लस अधिकारी आणि चार लसीकरण अधिकारी असतील.
4 / 7
जेव्हा लसीकरण कक्षात एखाद्या स्त्रीला लसी दिली जाते तेव्हा महिला कर्मचारी सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असेल. मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण स्थळावर दिवसभरात केवळ 100 लोकांना लसी दिली जाईल. जर लॉजिस्टिक्स चांगले असतील तर ते 200 पर्यंत वाढविले जाऊ शकते.
5 / 7
कोविड व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क (को-डब्ल्यूआयएन) सिस्टिम विकसित केली गेली आहे. या डिजिटल व्यासपीठावर स्टॉकच्या आणि लसीच्या वितरणाविषयी रीअल-टाइम अपडेट्स मिळतील
6 / 7
लसीसाठी कोणाची नोंदणी केली गेली आहे आणि त्यांचे लसीकरण केव्हा होईल याचे अपडे्ट या सिस्टिमध्ये मिळतील.
7 / 7
लवकरच वेबसाइट सुरू केली जाईल. तेथे मतदार आयडी, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पेन्शन कागदपत्र अशा 12 फोटो आयडीपैकी एकाच्या मदतीने नोंदणी करता येईल. त्यानंतर मध्यभागी फोटो आयडी लावला जाईल.
टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या