covid19 has significant impact on liver apart from lungs and heart finds mumbai civic hospital study
Corona Virus : फुफ्फुस, हृदयासोबतच कोरोनामुळे लिव्हरचंही मोठं नुकसान; रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 5:40 PM1 / 10कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून मृतांचा आकडा देखील वाढला आहे. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देश देखील कोरोनाच्या भयंकर संकटाचा सामना करत आहे. 2 / 10कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. श्वसन आणि इतर महत्त्वाच्या अवयवांव्यतिरिक्त, कोरोना संसर्गाचा लिव्हरवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. 3 / 10मुंबईतील सरकारी रुग्णालय असलेल्या बीवायएल नायर रुग्णालयात केलेल्या अभ्यासात ही महत्त्वाची बाब समोर आली आहे. येथे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या अभ्यासात असे आढळून आले की ज्या रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला त्यापैकी अर्ध्या रुग्णांचे लिव्हर खराब झाले आहे. 4 / 10मुंबईतील हे रुग्णालय कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक होतं. हा अभ्यास नुकताच 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च'मध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णांपैकी 46 टक्के रुग्णांना कोरोनामुळे लिव्हरशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागले असल्याचे सांगण्यात आले आहे.5 / 10नायर हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डीन डॉ. प्रवीण राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या अभ्यासात फुफ्फुस आणि हृदयाप्रमाणेच लिव्हरवरही कोविड-19 चा परिणाम झाला आहे.' कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. 6 / 10हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजय चंदनानी म्हणाले की, हे ज्ञात आहे की कोविड-19 श्वसन, आतड्यांसंबंधी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि इतर अवयव प्रणालींवर परिणाम करतो, परंतु लिव्हर परिणामावर फार कमी अभ्यास झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 7 / 10इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलेक्युलर सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की कोविड-19 ने महिलांपेक्षा पुरुषांवर जास्त हल्ला केला आहे आणि त्यांचे अधिक नुकसान केले आहे. हा व्हायरस फुफ्फुसांवर अधिक सहजपणे हल्ला करतो.8 / 10कोरोना XBB.1.5 चा नवीन व्हेरिएंट देखील लोकांवर वेगाने हल्ला करत आहे. विशेषत: ज्यांना कोरोनापूर्वी बाधित झाले होते, त्यांच्यावर त्याचा अधिक परिणाम होत आहे. अलीकडेच एका नव्या संशोधनातही हा दावा करण्यात आला आहे.9 / 10वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितले होते की हा नवीन व्हेरिएंट जवळपास 38 देशांमध्ये सापडला आहे. अमेरिकेत 82 टक्के कोरोना प्रकरणे या नवीन व्हेरिएंटची आहेत. डेन्मार्कमध्ये 2 टक्के आणि ब्रिटनमध्ये 8 टक्के प्रकरणांमध्ये हा प्रकार आढळून आला आहे.10 / 10लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही या व्हेरिएंटचा लोकांवर परिणाम दिसून येत आहे. डब्ल्यूएचओने यापूर्वी असेही म्हटले होते की, देशातून कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. म्हणूनच प्रत्येकाने पूर्वीप्रमाणेच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications