Cucumber recipes to make this summer cool
काकडी करेल कूssल!; 'या' ५ रेसिपी उन्हाळ्यात देतील थंडावा By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 4:06 PM1 / 7फेब्रुवारी महिना संपायला काहीच दिवस बाकी आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते. सध्या वातावरणात बदल जाणवत असून दिवसा उकाडा व रात्री गारवा अनुभवायला मिळतोय. लवकरच येणाऱ्या उन्हाळ्यात तुमचं संरक्षण कसं करता येईल, यासाठी काही खास टिप्स तुम्हाला देणार आहोत. 2 / 7काकडी ही फळभाजी थंड असते म्हणून उन्हाळ्यात तिचा जास्त वापर केला जातो. काकडीत ९० टक्के पाणी असल्याने शरीराला आवश्यक पाण्याची पातळी काकडीतून गाठता येते. फक्त कोशिंबीरच नाही, तर काकडीच्या या आणखीही रेसिपी सहज बनवता येऊ शकतात. त्यापैकीच या पाच रेसिपी... उन्हाळ्यात नक्की ट्राय कराव्यात अशा...3 / 7१) काकडीचं थंडगार सूप - उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर थंडगार काहीतरी पिण्याची इच्छा होते. अशावेळी पाण्याऐवजी तुम्ही काकडीचा रस पिऊ शकता. काकडीचा रस करून तो फ्रिजमध्ये ठेवा व काही वेळाने थंड रस प्या. आरोग्यासाठी हा रस फायदेशीर ठरेल सोबतच शरीराला थंडावाही मिळेल. 4 / 7 २) काकडीचे पकोडे - बेसनाच्या पिठात काकडीचे गोल काप कापून किंवा किसून नीट एकत्र करावेत. नंतर बटाटाभजीप्रमाणे किंवा बेसनपोळ्याप्रमाणे तळून घ्या. सॅाससोबत हा पदार्थ फार चविष्ट लागतो.5 / 7 ३) काकडीचा ज्यूस - काकडीचा रस, लिंबाचा रस, साखर यांचं मिश्रण घेऊन थंड करून ते प्यावं. उन्हात येणाऱ्या घामामुळे शरीरातील क्षारांची संख्या कमी होते. म्हणून काकडीचा ज्यूस हा नेहमीच उपयोगाचा असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.6 / 7४) काकडीचा रायता - उन्हाळ्यात रोजच्या जेवणासोबत काकडीचा किंवा इतर भाज्यांचा थंड रायता खाल्ला तर शरीराला उष्णतेचा त्रास होत नाही. काकडीसोबतच टोमॅटो, गाजर यांचा रायत्यात समावेश केल्याने उन्हाळ्यात डोळ्यांना किंवा त्वचेला होणारा दाह कमी होतो.7 / 7५) नुसती काकडी - जर तुम्हाला कोणतीही रेसिपी बनवण्याचे कष्ट नको असतील तर तुम्ही काकडी धुऊन त्याचे काप करून खाऊ शकता. या फोडींना मीठ व मिरी पावडर लावल्यास त्या चवदार-चविष्ट होतील. आणखी वाचा Subscribe to Notifications