शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सायकलिंग की चालणं... तुमच्या आरोग्यासाठी कोणता व्यायाम आहे सर्वोत्तम?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 3:14 PM

1 / 11
सायकलिंग आणि चालणं हे दोन सर्वात सामान्य आणि सोपे व्यायाम आहेत. याचे शरीराला देखील असंख्य फायदे आहेत. सायकलिंग की चालणं यापैकी आरोग्यासाठी कोणता व्यायाम सर्वोत्तम आहे असा प्रश्न आतापर्यंत अनेकांना पडला असेल. त्याबाबत जाणून घेऊया...
2 / 11
चालणं हा सर्वात सोपा व्यायाम आहे. तसेच यासाठी चांगल्या शूज शिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गरज नसते. चालण्यामुळे मन प्रसन्न होतं. फ्रेश वाटतं, ताण कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारतं.
3 / 11
चालण्याचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी तुमचं डेली स्टेप्स टार्गेट ठरवा. विविध निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा. चालण्याच्या आधी किंवा नंतर पाणी प्या म्हणजेच हायड्रेटेड राहा.
4 / 11
सायकलिंग हा एक गतीशील व्यायाम आहे. कार्डिओ फिटनेस हवा असेल तर सायकलिंग करणं अत्यंत चांगलं आहे. सायकलिंगमुळे तुम्ही चालण्याच्या तुलनेत अधिक अंतर पार करता. त्याचेही अनेक फायदे आहेत.
5 / 11
सायकलिंगचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी, तुमच्या गरजेनुसार सायकल खरेदी करा. यामध्ये सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे, म्हणून नेहमी हेल्मेट घाला आणि वाहतूक नियमांचे पालन करा.
6 / 11
दुखापती टाळण्यासाठी सायकल चालवण्यापूर्वी वॉर्म-अप करा आणि नंतर कूल-डाउन करा. सायकल चालवणे आणि चालणे यामधील निवड हे शेवटी तुमची वैयक्तिक पसंती, फिटनेस लेवल आणि लाईफस्टाईल यावर अवलंबून असते.
7 / 11
जर तुम्ही उच्च-तीव्रतेच्या वर्कआउट्सचा आनंद घेत असाल आणि कमी वेळेत जास्त अंतर पार करायचं असेल तर तुमच्यासाठी सायकलिंग हा एक चांगला पर्याय असू शकतो.
8 / 11
दुसरीकडे, जर तुम्ही कमी-प्रभावशाली व्यायामाला प्राधान्य देत असाल ज्यामुळे तुम्हाला आराम करता येईल आणि आनंद घेता येईल, तर चालणं हा आदर्श पर्याय असू शकतो.
9 / 11
दोन्ही व्यायामामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फिटनेस, वेट मॅनेजमेंट आणि तणाव कमी करण्यासह अनेक आरोग्य फायदे आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आवडेल अशी एक्टिव्हिटी निवडा आणि तुमच्या रुटीनमध्ये त्याचा समावेश करू शकता.
10 / 11
कोणत्याही प्रकारचा व्यायाम आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. एखाद्या गोष्टीची हळूहळू सुरुवात करा आणि नंतर स्पीड, व्यायामाचा कालावधी वाढवा. अतिव्यायाम किंवा शरीराला त्रास होईल असा व्यायाम करू नका. विश्रांती घ्या.
11 / 11
सायकल चालवणे किंवा चालणं याचा जर आपण आपल्या रुटीनमध्ये समावेश केला तर तुम्ही फिट राहण्यासोबतच आरोग्य सुधारेल. यामुळे तुम्ही निरोगी आणि आनंदी जीवनाकडे एक पाऊल टाकत आहात.
टॅग्स :Healthआरोग्यCyclingसायकलिंगHealth Tipsहेल्थ टिप्स