शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Shaving Benefits : रोज शेविंग करण्याचे हे खास फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचाल, तर कधीच दाढी ठेवणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 4:19 PM

1 / 7
रोज शेव्हिंग केल्याने आपली त्वचा केवळ सुंदरच होत नाही, तर शेविंग तिच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते, हे आपल्याला माहिती आहे का? लाइफ स्टाइल एक्सपर्ट्स आणि त्वचा तज्ज्ञांने म्हणणे आहे, की रोज शेविंग केल्याने केवळ चेहऱ्याचे केसच साफ होत नाहीत, तर त्वचेवर तयार झालेली डेड स्किनही निघून जाते. तसेच चांगल्या पद्धतीने शेविंग केल्यास आपल्याला फ्रेश झाल्यासारखेही वाटते.
2 / 7
प्रोडक्टिव्ह असतात असे लोक - खरे तर, शेविंगशी संबंधित एका अध्ययनातून खुलासा झाला आहे, की सकाळी उठून सर्वप्रथम शेविंग करणारे लोक अधिक प्रोडक्टिव्ह असतात. या अध्यनानुसार, जे लोक कामावर जाण्यापूर्वी, सकाळीच उठून शेविंग करतात, त्यांच्यात दैनंदिन कामे अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची अधिक क्षमता असते.
3 / 7
बॅक्टेरियापासून बचाव - आपल्या दाढीच्या केसांमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया लपलेले असतात, जे आपली त्वचा खराब करायचे काम करतात. यामुळे चेहऱ्यावर डाग वाढण्याचीही शक्यता असते. रोज शेविंग केल्याने या बॅक्टेरियापासून दूर राहता येते.
4 / 7
पीएच लेव्हल मेंटेन राहते - रोज शेविंग करताना आपण ज्या प्रोडक्ट्स शेविंग ​क्रीम, जेल, प्री-शेव ऑईल अथवा बामचा वापर करता, ते सर्व आपल्या स्कीनची पीएच लेव्हल बॅलेन्स ठेवण्यास मदत करतात.
5 / 7
रोज शेविंग करण्याचे फायदे - नियमित शेविंग केल्याने त्वचेवरील डेड स्किन तर दूर होतेच, शिवाय त्वचेची मसाजही होते. नियमित शेविंग केल्याने त्वचेतील मेलानिन आणि कॅराटिनचे प्रोडक्शनही वाढते. यानंतर तयार होणारी नवी स्किन जुन्या स्कीनच्या तुलनेत अधिक ताजी तवाणी दिसते आणि तिला लवकर रिकव्हर होण्याची संधी मिळते.
6 / 7
शेविंगवेळी करून पाहा हे खास घरगुती उपाय - स्किन एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे, की शेविंग करताना काही तरी नॅच्युरल गोष्टी स्किनवर लावल्यास अधिक फायदा होतो. शेविंग नंतर चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण थंड दूध, पपई, अॅप्पल सायडर व्हिनेगरसारख्या काही गोष्टी वापरू शकतात. यांमुळे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर रॅशेज, जळजळ आणि खाज येण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
7 / 7
(टीप - या स्टोरीमध्ये सांगण्यात आलेल्या टिप्स केवळ सर्वसामान्य माहितीसाठी आहेत. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Healthआरोग्यLifestyleलाइफस्टाइल