dangers of wearing high heels
उंच टाचांच्या चप्पल वापरत असाल तर सावधान! By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 12:55 PM1 / 6व्यक्तिमत्व खुलून येण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील अशा गोष्टी करायला प्रत्येकीला आवडतं. आजकाल सर्वच स्त्रियांना उंच टाचांच्या चप्पल घालणं आवडतं. पण व्यक्तिमत्व आणि आवड सांभाळताना तुम्हाला तुमच्या आरोग्याचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून जर उंच टाचांच्या चप्पल घालत असाल ‘या’ 5 गोष्टींचा नक्की विचार करा.2 / 6१) कंबरेचं दुखणं – उंच टाचांच्या चप्पलांचा थेट प्रभाव आपल्या कंबरेवर होतो. तसंच उंच टाचांच्या चप्पल पायाला पूर्ण आधार देत नाहीत, म्हणून शरीराचा संपूर्ण तोल कंबरेला सांभाळावा लागतो. त्यामुळे कंबरदुखीला सुरूवात होते.3 / 6२) पायांचे स्नायू – टोकदार टाचांच्या चप्पलमुळे पायांच्या स्नायूंवर ताण येतो व पाय दुखणं चालू होतं. तसंच टोकदार टाचांमुळे पायांच्या नसा दुखायला सुरुवात होते.4 / 6३) पायांच्या बोटांचं दुखणं – पायांच्या बोटांवर उंच टाचांचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. तसंच उंच टाचांच्या चपलांना समोरुन वेगवेगळे आकार असल्याने पायाची बोटे काही कालावधीनंतर दुखण्यास सुरूवात होते.5 / 6४) रक्तवाहिन्या आकुंचन पावतात – उंच टाचांच्या चप्पल घातल्याने तुमचे पाय आकर्षिक दिसतातच, पण पायांवर ताण पडल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व रक्तपुरवठाही कमी होण्याची शक्यता असते.6 / 6५) पायांच्या टाचांना दुखापत – पायांच्या टाचांना ताण देऊन जास्त वेळ चालल्याने टाचांना दुखापत होते व टाचांवर ताण येतो. तसंच कंबरेपासून टाचांपर्यंत दुखणं चालू होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications