Deficiency of protein can cause serious illness, know symptoms, diet
शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर दिसतात 'ही' लक्षणे; वेळीच व्हा सावध! नाही तर पडेल महागात... By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 1:23 PM1 / 10एडिमा – शरीराच्या कोणत्याही अवयवावर जर अचानक सुज आली असेल तर त्यास ‘एडिमा’ असे म्हटले जाते. ही समस्या शरीरात प्रोटीन कमी असल्याचा एक संकेत आहे. म्हणूनच या समस्येकडे जास्तकाळ दुर्लक्ष न करता त्वरित प्रोटीन लेवलची तपासणी करून घ्यावी.2 / 10फॅटी लिव्हर-यकृतामध्ये चरबी वाढते तेव्हा फॅटी लिव्हर ज्याला हेपॅटिक स्टेटोसिस देखील म्हणतात. आपल्या यकृतामध्ये जास्त चरबी निर्माण होणे अतिशय गंभीर आहे. प्रोटीनच्या कमतरतेमुळे लिव्हरमधील फॅट वाढू लागते आणि फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते.3 / 10अॅनिमिया – ही शरीरातील अशी अवस्था आहे, ज्यामध्ये आपल्या शरीरातील रक्त हे लाल रक्तपेशी बनवण्यामध्ये अयशस्वी ठरतात. परिणामी लाल रक्त पेशींची संख्या कमी होत जाते. शरीरात जर लाल रक्त पेशी कमी झाल्या तर बीपी कमी होणे आणि थकवा जाणवणे अशा समस्या निर्माण होतात. यालाच अॅनिमिया असे म्हटले जाते.4 / 10हाडे कमकुवत होणे प्रोटीन शरीरात कमी झाले असेल तर शरीरातील हाडे कमकुवत होत जातात. हाडांच्या स्वास्थ्यासाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचे आहे. जे लोक हाय प्रोटीन डाइट घेतात त्यांच्यामध्ये ७०% हाडे कमकुवत होण्याची शक्यता नसते.5 / 10अधिक भूक लागणे – जेव्हा एखादी व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते, तेव्हा त्यांना हाय प्रोटीन डायट दिला जातो. प्रोटीन शरीराच्या चयापचय प्रक्रियेला तृप्त ठेवतो. त्यामुळे जर भूक वाढत असेल तर शरीरामध्ये प्रोटीनची कमी आहे हे समजावे.6 / 10आपले केस आणि नखे निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे, म्हणून जर आपल्या शरीराला पुरेसा प्रोटीन मिळत नसेल तर आपले केस आणि नखे देखील कमकुवत दिसू लागतील. शरीरात प्रोटीन कमी झाले की, नखे आणि केस सारखेच तुटतात.7 / 10जखम बरी होण्यास वेळ लागणे – जर तुमची जखम बराच काळ ठीक होत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची मात्रा कमी आहे हे समजावे.8 / 10सुरकुत्यांची समस्या -आपल्या त्वचेला निरोगी राहण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतात. जर आपल्या त्वचेला पुरेसे प्रोटीन न मिळाल्यास आपली त्वचा मऊ होऊन त्यावर सुरकुत्या येण्यास सुरूवात होते. यामुळे वयाआधीच आपण वृद्ध दिसतो. यामुळे आपल्या त्वचेसाठी प्रोटीन आवश्यक असतात.9 / 10लहान मुलांच्या विकासात अडथळा- प्रोटीन फक्त आपली हाडे व मांसपेशींच मजबूत करत नाहीत तर शरिराच्या विकासामध्ये प्रोटीनची फार आवश्यकता असते. लहान मुलांच्या विकासामध्ये प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावते. प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्यांच्या विकासात अडथळा येतो.10 / 10प्रोटीनसाठी आहार- मोड आलेले मूग, सर्व प्रकारच्या डाळी (तूर, उडीद, चने, मसूर, मूग), ओट्स, धान्य, सूकामेवा, बीन्स, शेंगदाणा बटर, शेंगदाणे आणखी वाचा Subscribe to Notifications