Dengue healthy diet for dengue patient in marathi eat these superfoods in dengue for early recovery
डेंग्यूवर उपाय म्हणून 'या' पदार्थांचं करा सेवन; लवकर व्हाल बरे By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 4:44 PM1 / 12पावसाळ्यामध्ये अनेक आजार आपली डोकी वर काढतात. अशातच मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या डासांमुळे होणारे आजार थैमान घालतात. जर तुम्ही विशेष काळजी घेतली तर डासांपासून स्वतःचा बचाव करू शकता. पण जर तुम्हाला डेंग्यू झालाचं तर तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. डेंग्यूदरम्यान शरीरातील ब्लड प्लेटलेट्स वेगाने कमी होतात. अशातच योग्य आहार नाही घेतला तर रूग्णाच्या जीवालाही धोका असतो. त्यामुळे डेंग्यूचे निदान झाल्यानंतर आहारामध्ये प्लेटलेट्स काउंट वाढविणाऱ्या पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. 2 / 12प्लेटलेट्स वाढविण्यासाठी पपईची दोन पानं वाटून त्यांचा ज्यूस तयार करा. सकाळी किंवा रात्री या ज्यूसचं सेवन करा. एवढंच नाहीतर पपईची पानं चहाप्रमाणे उकळून त्यांचा रस पिणंही डेंग्यूसाठी फायदेशीर ठरतं. तसेच गुळवेल पांढऱ्या पेशी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही मदत करते. 3 / 12डेंग्यूच्या रूग्णांनी जास्तीत जास्त पाणी पिणं आवश्यक असतं. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या होत नाही. 4 / 12डेंग्यूच्या रूग्णांना व्हिटॅमिन्सची फार गरज असते. अशातच रूग्णांना व्हिटॅमिनयुक्त फळं देणं आवश्यक असतं. यामुळे शरीराती रोगप्रतिकार शक्ती वाढते. व्हिटॅमिनयुक्त फळांमध्ये संत्री, पपई, पेरू, किवी आणि स्ट्रॉबेरी इत्यादी फळांचा समावेश करणं गुणकारी ठरतं. डेंग्यूचे व्हायरस आणि बॅक्टेरियांचा प्रभाव कमी करण्यासाठी आलू बुखार, कलिंगड आणि चेरीचं सेवन करू शकता. 5 / 12डेंग्यूमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. अशातच भाज्या उकडून खाणं फायदेशीर ठरतं. रूग्णांना व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात देणं फायदेशीर ठरतं. टोमॅटो, भोपळा, गाजर, काकडी, बीट इत्यादी फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. तसेच प्लेटलेट्स काउंट वाढविण्यासाठी 2 ते 3 चमचे बीटाचा रस एकत्र करून प्या.6 / 12डेंग्यू दरम्यान रूग्णांना हाडांमध्ये वेदना होतात. अशावेळ सूप आणि दलिया खाण्यासाठी देणं फायदेशीर ठरतं. तसेच रूग्णांना एनर्जी मिळण्यास मदत होते. 7 / 12डेंग्यू झाल्यावर आलं आणि वेलची एकत्र करून हर्बल टी तयार करावा. हा हर्बल चहा प्यायल्याने रूग्णाची अस्वस्थता कमी होते. 8 / 12डेंग्यूची लागण झाल्यानंतर कमी होणाऱ्या प्लेटलेट्स वाढविण्यासाठी नारळाचं पाणी पिणं अत्यंत आवश्यक असतं. नारळाच्या पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनरल्स यांसारखी पोषक तत्व असतात. 9 / 12डेंग्यूच्या रूग्णांना प्रोटीनची फार गरज असते. त्यामुळे रूग्णांनी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. 10 / 12डेंग्यूच्या रूग्णांनी जास्तीत जास्त प्रमाणात पेय पदार्थांचं सेवन करणं गरजेचं असतं. अशातच शरीराचा थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराच्या मजबूतीसाठी आल्याचं कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. 11 / 12शरीरामध्ये असलेले व्हायरस आणि विषारी तत्व बाहेर टाकण्यासाठी लिंबाचा रस पिणं अत्यंत आवश्यक असतं. डेंग्यूच्या तापावर लिंबाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. यामुळे यूरिन मार्फत व्हायरस बाहेर टाकण्यास मदत करतं. 12 / 12टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. आणखी वाचा Subscribe to Notifications