आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात नैराश्य येणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. अनेक जण हे नैराश्याचे बळी ठरलेले आपण पाहतो. या सर्व बाबींचा मग इतर गोष्टींवर परिणाम होत असतो. त्यामुळे वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं असतं. काहींना या नैराश्यावर विजय मिळवता येतो. परंतु, बऱ्याच जणांना यातून बाहेर पडता येत नाही. अशावेळी नैराश्य घालवण्यासाठी बाह्य उपचार मदत करतात. नैराश्य घालवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक औषधी सांगणार आहोत. ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला ताण-तणावापासून मुक्ती मिळेल.ब्राह्मीनैराश्य या आजारात आयुर्वेदिक वस्तुंचा जास्त वापर केला जातो. आयुर्वेदिक वस्तुंमध्ये जी शक्ती असते ती इतर गोष्टींमध्ये नसते. ब्राह्मी तणाव उत्पन्न करणाऱ्या हार्मोन कोर्टिसोलला कमी करण्याचे काम करते. ब्राह्मी मस्तिष्काला शांत करण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यालाही मदत करते.अश्वगंधाआयुर्वेदिक वस्तुंची यादी करायला बसलो तर अश्वगंधा हे नाव आपण विसरूच शकत नाही. आता हेच पाहा ना, अश्वगंधामध्ये एमीनो अॅसिड्स आणि व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असते. शिवाय अश्वगंधा तुमची क्षमता वाढवण्याचे काम करते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही.भृंगराजभृंगराज चहा मस्तिष्काला निरंतर उर्जा देण्याचे काम करते. यामुळे मस्तिष्कामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होते. हे डोक्याला शांत ठेवते तसेच पूर्ण शरीराला आराम मिळतो.जटामासीजटामासी अँटी स्ट्रेस हर्बच्या रूपात फारच प्रसिद्ध आहे. तणाव दूर करण्यासाठी जटामासीच्या जडांचा वापर औषधींच्या स्वरूपात केला जातो. या जडा आमच्या मस्तिष्क आणि शरीराला टॉक्सिन्सहून मुक्त करतात आणि मेंदूकार्याला मदत करते.