Detox your body in 5 ways dirt accumulated in body will be removed
5 उपायांनी बॉडी करा डिटॉक्स, शरीरातील विषारी पदार्थ निघतील बाहेर; आजारांचा धोका होईल कमी By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 11:46 AM1 / 7Natural Way To Detox Body: आपलं असं असतं की, ते नॅच्युरल पद्धतीने स्वत:ला डिटॉक्स करू शकतं. अनेक आपण खाण्या-पिण्याच्या चुकांमुळे आणि राहणीमानात इतका निष्काळजीपणा करतो की, शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रोजच्या जगण्यात काही बदल करून तुम्ही कसे बॉडी डिटॉक्स करू शकता.2 / 7डिटॉक्स म्हणजे एका खास प्रकारच्या डाएटचं पालन करणं, ज्याच्या मदतीने शरीरात जमा झालेलं टॉक्सिन म्हणजे विष बाहेर काढता येतं आणि आरोग्य चांगलं ठेवता येतं. हेच नाही तर याच्या मदतीने तुम्ही वजनही कमी करू शकता. हेल्थलाइननुसार, शरीराला डिटॉक्स करण्यासाठी वेगळ्या आहाराची किंवा कशाची गरज पडत नाही. फक्त लाइफस्टाईलमध्ये काही बदल करून तुम्ही हे काम करू शकता. 3 / 7जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात अल्कोहोलचं सेवन करता तेव्हा याने लिव्हरवर सूज, फॅट इत्यादी तयार होतं. ज्यामुळे लिव्हरचं काम प्रभावित होतं. लिव्हरने योग्य काम केलं नाही तर शरीरातील अशुद्ध रक्त निटपणे फिल्टर होणार नाही. यापासून वाचण्यासाठी बेस्ट उपाय म्हणजे अल्कोहोलचं सेवन काही दिवसांसाठी बंद करा. हळूहळू लिव्हर ठीक होईल आणि चांगल्या पद्धतीने बॉडी डिटॉक्स करण्यास मदत मिळेल.4 / 7बॉडीच्या डिटॉक्स सिस्टमला चांगलं ठेवण्यासाठी रात्री पुरेशी झोप घेणं फार महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा मेंदू दिवसभर जमा झालेलं टॉक्सिन म्हणजे बीटा एमिलॉयड नावाचं प्रोटीनसारख्या गोष्टी क्लीन करण्यास मदत मिळते. याने अल्झायमर रोगाचा धोका वाढतो. इतकंच नाही तर झोप पूर्ण न झाल्याने तणाव, हाय बीपी, डायबिटीस, लठ्ठपणाही वाढू शकतो. अशात रात्री 7 ते 8 तास झोप घेणं फार गरजेचं आहे. याने शरीर डिटॉक्स होतं.5 / 7जर तुम्ही दिवसभरात 3 ते 4 लीटर पाण्याचं सेवन कराल तर याने नॅच्युरल पद्धतीने शरीरात जमा झालेलं टॉक्सिन जसे की, यूरिया, कार्बन डायऑक्साइड इत्यादी बाहेर निघतात. याने बॉडी डिटॉक्स होते. तसेच याने शरीरातील अवयवही योग्यपणे काम करतात. किडनी निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी गरजेचं आहे.6 / 7जर तुम्ही तुमचं शरीर अॅक्टिव ठेवत असाल तर याने शरीरात विनाकारण झालेलं इंफ्लामेशन कमी करण्यास मदत मिळते. याने ब्लड फ्लो सुद्धा सुरळीत राहतो. ज्यामुळे बॉडी डिटॉक्सिफिकेशन सिस्टम चांगल्या पद्धतीने काम करतं. याने शरीर अनेक आजारांपासून वाचतं.7 / 7अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, जर तुम्ही जास्त प्रमाणात साखर आणि प्रोसेस्ड फूडचं सेवन करत असाल तर लठ्ठपणा, कॅन्सर, हृदयरोग, डायबिटीस अशा गंभीर आजारांचा धोका वाढतो. यांमुळे लिव्हर आणि किडनी दोन्हींची नॅच्युरल फिल्टर क्षमता प्रभावित होते. ज्यामुळे शरीरात टॉक्सिन पदार्थ अधिक वाढू लागतात. अशात या पदार्थांचं सेवन करणं टाळा. आणखी वाचा Subscribe to Notifications