शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डायबिटीज नियंत्रणात आणायचाय?, मग हे नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 1:47 PM

1 / 5
कारले : कारल्यातील कॅरेटिन नावाच्या रसायनामुळे डायबिटीज नियंत्रित करता येतो. याशिवाय, यामध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले स्टिरॉइड्स आपल्या शरीरातील साखरेचा स्तर नियंत्रित करतात. डायबिटीज असणा-यांना नेहमी कारल्याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारल्याच्या सेवनामुळे तुमच्या शरीराला अत्यंत फायदा होता. नियमित 100 मिलीलीटर कारल्याचा रस तीन वेळा पाण्यातून प्यायल्यास डायबिटीजच्या रुग्णांना यांचा चांगला फायदा होता.
2 / 5
मेथीचे दाणे : मेथीचे दाणे पदार्थांची चव वाढतात, सोबतच शरीराचं आरोग्यही चांगलं ठेवण्यास मदत करतात. मेथीच्या दाण्यांची पेस्ट करुन जेवणापूर्वी 15 मिनिटांपूर्वी खावी.
3 / 5
दूध : दूध हे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचे परिपूर्ण असं मिश्रण आहे. हे साखरेच्या स्तराला नियंत्रित करण्याची मदत करते. नियमित आहारात एक ग्लास दूधाचे सेवन करावे.
4 / 5
मध : कार्बोहायड्रेट्स, कॅलरी आणि अनेक प्रकारचे सूक्ष्म पोषक तत्त्व मधामध्ये आहेत. मध डायबिटीज कमी करण्यास मदत करतं. यामुळेच डायबिटीज रुग्णांना साखरऐवजी मधाचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
5 / 5
प्रथिने : डायबिटीजच्या रुग्णांनी योग्य प्रमाणात प्रथिनांचं सेवन कराव. दूध, दही, ताक, पनीर, अंडी, मासे, सोयाबीन इत्यादींचं सेवन करावं. इन्सुलिन किंवा औषधांचं सेवन करणा-या डायबिटीज रुग्णांनी योग्य वेळी जेवण करावं. आहारात कोशिंबिरीचंही सेवन करावे
टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेह