Diabetes diet include these flours in your diet to control blood sugar
आहारातील पिठांचा समावेश ब्लडशुगर कमी करण्यासाठी 'कसा' आहे फायदेशीर! By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 10:21 AM1 / 10डायबिटीसची समस्या ही खूप सामान्य आहे. भारतात दिवसेंदिवस डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. तुम्हाला माहीत असेल की डायबिटीस असेलेल्या लोकांना आपल्या डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पथ्य पाळावी लागतात. फास्ट फुड, तेलकट न खाण्याची पथ्य पाळून आहार घ्यावा लागतो 2 / 10रक्ततातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी गव्हाच्या चपातीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण त्याव्यतिरिक्त अनेक फायबर्सयुक्त पिठांचा जर तुम्ही आहारात समावेश केला तर तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. 3 / 10शिंगाड्याचे पीठ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतं. त्यामुळे रक्ततील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. एका रिसर्चनुसार शिंगाडेचे पीठ वजन कमी करण्यसाठी सुद्धा फायदेशीर ठरत असतं. हृदयाला चांगले ठेवण्यासाठी सुद्धा या पीठाचं सेवन करणं आवश्यक आहे. 4 / 10आरोग्याला फायदे मिळवून देत असलेल्या पिठांचा आहारात समावेश केल्यास शरीर चांगलं राहील. 5 / 10चण्याच्या पिठात डायटरी फायबर्स असतात. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी चण्याचे पीठ फायदेशीर ठरत असते. चण्याचं पीठं कमी कार्बस्, स्टार्च आणि फायबर्सचे चांगले स्त्रोत आहे6 / 10राजगिरा पिठात अनेक पोषक तत्व असतात. मधुमेहासाठी राजगिरा महत्वाचा समजला जातो. त्यात प्रोटीन्स, मिनरल्स आणि व्हिटामीन्स तसंच लिपिड्स असतात. या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतात. राजगिरा आणि चपाती यांचा आहारात समावेश करा. 7 / 10ज्या लोकांना डायबिटिसचा त्रास आहे अशा लोकांनी चपातीचे सेवन केलं तर शरीरासाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी सकाळी चपाती दुधात कुस्करून खाल्ल्यास नाष्त्यासाठी एक चांगला ऑप्शन असेल तसंच यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील.8 / 10 अनियमीत जीवशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकिच्या पद्धतींमुळे एसिडिटीची समस्या अनेकांना जाणवत असते. या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी दुधासोबत चपाती खा. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळतो. 9 / 10तसंच अशक्तपणा जाणवत असेल तर भाकरीच्या सेवनाने अशक्तपणा कमी होतो. 10 / 10भाकरी किंवा चपातीचा आहारात समावेश तुम्ही वजन कमी करण्याासाठी सुद्धा करू शकता. शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी आहारात पिठांचा समावेश करा. आणखी वाचा Subscribe to Notifications