Diet Plan: A diet that works for others will not necessarily work for you; Make your own diet plan!
Diet Plan: दुसऱ्यांना मानवणारे डाएट तुम्हाला मानवेलच असे नाही; स्वतःचा डाएट प्लॅन स्वतः बनवा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 11:58 AM1 / 9गेल्या काही वर्षात लोक शरीर स्वास्थ्याबद्दल जागरूक झालेली दिसतात. हे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे. मात्र काही जण आपल्या शरीराची निकड, गरज न ओळखता केवळ दुसरे करतात तसा व्यायाम, डाएट फॉलो करतात आणि त्याचे दुष्परिणाम झाले की पश्चात्ताप करतात. 2 / 9उदा. इंटरमिटेन्ट फास्टिंग, किटो डाएट, दीक्षित डाएट, दिवेकर डाएट असे अनेक डाएट प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात. त्या डाएटनुसार दिलेली पथ्य पाळूनही कोणाला फास्ट रिझल्ट मिळतो तर कोणाला तसूभरही फरक पडत नाही. 3 / 9अशा वेळी रागाच्या किंवा नैराश्याच्या भरात ओव्हर इटिंग किंवा इमोशनल इटिंग अर्थात अतिरिक्त तसेच भावनिक होऊन खाल्ले जाते. त्यामुळे एवढे दिवस केलेला संकल्प क्षणार्धात मोडतो आणि परिस्थिती जैसे थे होते किंवा अधिकच बिकट बनते! 4 / 9यासाठीच आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार डाएट तयार करायचा आहे. जो टिकेल आणि बदलही घडवेल. यासाठी तुम्हाला पुढील गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे आणि स्वतःच्या शरीरात होणारे कमी जास्त बदल नोंद करून ठेवायचे आहेत. त्यानुसार डाएटची आखणी आणि पूर्वतयारी करायची आहे. 5 / 9डाएट शब्द म्हटला की जंक फूड, फास्ट फूड, तेलकट-तुपकट खाणे आहारातून पूर्णतः वर्ज्य केले जाते. तसे केल्याने आपण काही काळ या पदार्थांपासून दूर राहू शकतो, पण डाएट मोडले की वजन दुपटीने वाढते. म्हणून सुरुवातीला या पदार्थांचे सेवन कमी कमी करत जावे व त्याची डायरीत नोंद करावी. 6 / 9घरचे अन्न पौष्टिक असले तरी सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी मानवतात असे नाही. जसे की काही जणांना फळांची, पालेभाज्यांची ऍलर्जी असते, तसेच भरपूर पाणी प्या वजन कमी होते, ही मात्रा सगळ्यांना लागू होणारी नाही. अति पाणी पिण्याने कोणाला पोटफुगी होऊ शकते, वारंवार लघवीला लागू शकते, शरीराचे जडत्त्व वाढते. म्हणून शरीराला मानवेल असे अन्न, पाणी घ्या. 7 / 9भूक लागली की खाणे हा कोणत्याही डाएटचा मुख्य गाभा आहे. अरबट चरबट गोष्टी खाण्यामुळे वजन वाढते. त्यामुळे भूक लागली की भुकेच्या पाऊण भाग जेवा, खा आणि पाव भाग पोटात मोकळा ठेवा. त्यामुळे पचनाला गती मिळेल. 8 / 9शरीर चक्र चालवण्यासाठी अन्न हे ऊर्जानिर्मितीचे काम करते. त्यामुळे जे अन्न खाऊन तुम्हाला सुस्तपणा जाणवत असेल, झोप येत असेल, असे पदार्थ टाळा, सात्विक आहार घ्या, फळं खा, साखर आणि तेलकट पदार्थ आहारातून कमी करा आणि जे पदार्थ खाऊन उत्साह वाटेल ते पदार्थ प्रमाणात खा. 9 / 9डाएट मध्ये गोड पदार्थ खाऊ नका सांगितले जाते, मात्र वाढलेल्या वजनाला एकाएक गोड पदार्थ देणे बंद केले की शरीर बंडखोरी करते. डाएट मोडावे अशी प्रेरणा देते. अशा वेळी खजूर, मनुका, मध आणि फळांच्या माध्यमातून डाएटमध्ये गोडवा पेरत राहा आणि आनंदी व निरोगी राहण्याचा संकल्प करा. आणखी वाचा Subscribe to Notifications